तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही तर महाराष्ट्रातही आहेत - संजय राऊत

केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत. या कारवाया खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत. त्यात देखील महाराष्ट्रात या कारवाया जरा जास्तच सुरू आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv
Published On

नवी दिल्ली - राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलेच तापले आहे. पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे आज माध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार टीका केली. केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही. केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत. या कारवाया खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू आहेत. त्यात देखील महाराष्ट्रात या कारवाया जरा जास्तच सुरू आहे. जे चिखल फेकत आहे, त्यांचे हातसुद्धा किती बरबटलेले आहेत, ते सुद्धा देशाला कळायला हवं.

हे देखील पहा -

संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे कागदपत्र सोपवल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. पंतप्रधान कार्यालयात मी काही पुरावे दिले आहेत. महाराष्ट्रातल्या तपास यंत्रणा यावर काम करतीलच. महाराष्ट्रात सुद्धा राज्याच्या तपास यंत्रणा आहेत.महाराष्ट्रात आर्थिक गुन्हे शाखा आहे, गुन्हे अन्वेषण विभाग आहे ते आपापल्या पद्धतीने काम करत आहे. पण केंद्रातल्या यंत्रणा काय करत आहेत, हे देखील यानिमित्तानं कळेल, असं सांगतानाच तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाहीत. त्या महाराष्ट्रातही आहेत, असा सूचक इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

Sanjay Raut
...त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरने आवश्यक - नितीन राऊत

भाजपच्या दोन-पाच लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे एक क्रिमिनिल सिंडिकेट चालवत आहेत याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवणं हे संसदेचा सदस्य आणि एक शिवसैनिक म्हणून देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते काम मी केलं असे देखील ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com