Sachin Pilot Vs Ashok Gehlot: काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलटांचा संघर्ष पेटला

Sachin Pilot Vs Ashok Gehlot: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे.
Sachin Pilot Vs Ashok Gehlot
Sachin Pilot Vs Ashok GehlotSaam tv
Published On

rajasthan political news: राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट याचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे. या दोघांच्या संघर्षामुळे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. (Latest Marathi News)

राजस्थानात काँग्रेसमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात संघर्ष पेटला आहे. पायलट यांनी रविवारी एका कथित भ्रष्टाचार प्रकरणावर मुख्यमंत्री गेहलोत यांनी कारवाई न केल्याच्या आरोप केला आहे. यावरून सचिन पायलट यांनी थेट राजस्थान सरकारच्या विरोधात एकदिवसीय उपोषणाची घोषणा केली आहे.

Sachin Pilot Vs Ashok Gehlot
Devendra Fadnavis On Akola Accident: मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार; फडणवीसांनी दिले महत्वाचे आदेश

काय आहे आरोप?

वसुंधरा सरकारवर झालेल्या आरोपांची चौकशी गेहलोत सरकार करत नसल्याने आज हुतात्मा स्मारकावर एकदिवसीय उपोषण करण्याचे पायलट यांनी जाहीर केले. 45 हजार रूपये कोटींच्या घोटाळ्याची तपासणी करण्याची पायलट यांची मागणी आहे.

सचिन पायलट यांनी उपोषणाची घोषणा केल्याच्या आधीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी राजस्थान सरकारबद्दल एक वक्तव्य केलं होतं. अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळात पक्षाला अनेक ऐतिहासिक संधी मिळाल्या असल्याचे त्यांनी म्हटलं.

Sachin Pilot Vs Ashok Gehlot
Maharashtra Unseasonal Rain: राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीसह घरांचे मोठ्या प्रमाणे नुकसान

जयराम रमेश यांनी पुढं म्हटलं की, राजस्थानात काँग्रेस सरकारने अशोक गेहलोत यांच्या साथीने मोठ्या प्रमाणात योजनांची अंमलबजावणी केली. या योजनांचा लोकांना चांगलाच प्रभाव पडला'.

'राजस्थानात भारत जोडो यात्रेदरम्यान पक्षाने केलेल्या संकल्पांना चांगलंच यश मिळत आहे. येणाऱ्या काळात आम्ही केलेल्या कामांच्या आधारावरच लोकांमध्ये जाणार आहोत,असेही जयराम रमेश यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com