सुशिल थोरात
Ahmednagar Unseasonal Rain : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक पिकांचे नुकसान झालेय यात प्रामुख्याने उन्हाळी हंगामात घेण्यात येणारे कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. (Latest Marathi News)
पारनेर (Parner) तालुक्यातील खडकवाडी, पळशी या भागात गारपीट आणि अति मुसळधार पाऊस (Rain) झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वनकुटे गावातील शेतकरी भीमराव पायमोडे यांनी तीन एकर कांद्याची लागवड केली होती. कांदा काढण्यासाठी आलेला असताना रात्री झालेल्या अतिवृष्टीने भुईसपाट झाला आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.
रात्री झालेल्या वादळी वारा आणि अतिवृष्टीने या भागातील घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास सात ते आठ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिक रस्त्यावर आले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे घरावरील पत्रे अक्षरशः पत्त्यासारखी उडत होती.
मात्र जीव मुठीत घेऊन महिला, मुलं आणि पुरुष मंडळी एका कोपऱ्यात बसून होते. दैवबलवत्तर म्हणून जीव वाचला आशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. तर काही नागरिक देखील जखमी झाले आहेत. तसेच गाई म्हशी आणि शेळ्या ह्या देखील मोठ्या प्रमाणात जखमी झाल्या आहेत.
आज पहाटे सहा वाजल्यापासूनच पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या भागाची पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सरकारने आता पंचनामे न करता तातडीने मदत करावी अशी मागणी आमदार लंके यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.