New Cancer Vaccine : कर्करोगावरील लस बनवण्यात रशियाला यश? रुग्णांसाठी कधी होणार उपलब्ध? जाणून घ्या

Russia Discover Cancer Vaccine : रशियामधून कर्करोगासंबंधीत दिलासादायक बातमी आली आहे. शास्त्रज्ञ कर्करोगाची लस बनवत असून प्रयोगाच्या अगदी जवळ पोहोचले असल्याची माहिती पुतीन यांंनी दिली आहे.
New Cancer Vaccine
New Cancer VaccineSaam Digital
Published On

New Cancer Vaccine

कॅन्सरचे नाव ऐकताच समोर फक्त मृत्यू दिसतो. तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असूनही कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणतीही घट दिसून आलेली नाही. अनेक देश यावर प्रभावी उपाय शोधण्यात व्यस्त आहेत. याच दरम्यान रशियामधून कर्करोगासंबंधीत दिलासादायक बातमी आली आहे. रशिया कर्करोगाची लस बनवत असून प्रयोगाच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी पुतिन म्हणाले की रशियन शास्त्रज्ञ कर्करोगासाठी लस तयार करण्याच्या जवळ आहेत जी लवकरच कर्करोगाच्या रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकते.

इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे काय?

शास्त्रज्ञ कर्करोगावरील लस आणि नवीन पिढीतील इम्युनोमोड्युलेटरी औषधांच्या निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. इम्युनोमोड्युलेटर्स ही अशी औषधे आहेत जी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काही बदल करतात ज्यामुळे रुग्णाला कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी अधिक मदत मिळते. मात्र रशियाने बनवलेली लस कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी आहे आणि ती कशी कार्य करेल याविषयी मात्र पुतीन यांनी स्पष्ट केलेलं नाही.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक देश करतायेत संशोधन

जगातील अनेक देश आणि कंपन्या कर्करोगाच्या लसींवर काम करत आहेत. मागच्याच वर्षी ब्रिटीश सरकारने पर्सनलाइज्ड कर्करोगाच्या उपचारांसाठी क्लिनिकल चाचणी सुरू केली. जर्मनीस्थित BioNTech च्या सहकार्याने. 2030 पर्यंत दहा हजार कर्करोग रुग्णांपर्यंत पोहोचण्याचं ब्रिटनचं लक्ष्य आहे. मॉडर्ना आणि मर्क अँड कंपनी या फार्मास्युटिकल कंपन्या देखील कर्करोगाच्या लसी बनवत आहेत. ही एक प्रायोगिक लस आहे. जेव्हा अशा लसीवर संशोधन सुरू असताना, तीन वर्षांच्या उपचारानंतर, त्वचेचा सर्वात प्राणघातक कर्करोग, मेलेनोमा किंवा त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता निम्म्यावर आल्याचं निदर्शनास आलं.

New Cancer Vaccine
Supreme Court on Electoral Bonds : सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, इलेक्टोरल बॉण्ड्स असंवैधानिक असल्याचं म्हणत घातली बंदी

सध्या किती कर्करोगाच्या लसी आहेत?

WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सध्या ह्युमन पॅपिलोमाव्हायरसविरुद्ध (HPV) सहा अधिकृत लसी आहेत. ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह अनेक कर्करोग होतात. याशिवाय, हिपॅटायटीस बी यामुळे यकृताच्या कर्करोग होतो त्यावर ही लस प्रभावी आहे.

कोविड दरम्यान स्वतःची लस बनवली

कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान, रशियाने कोविड 19 विरूद्ध स्पुतनिक व्ही. ही स्वतःची लस तयार केली. ही लस अनेक देशांना विक्री करण्यात आली होती. शिवाय स्पुतनिक V ने रशियामध्ये व्यापक स्वीकृती मिळविण्यासाठी संघर्ष केला आहे. पुतिन यांनी स्वत:ही लस घेतल्यानंतर लोकांना याची खात्री पटली होती

जगभरात कर्करोगामुळे 1 कोटीहून अधिक मृत्यू

जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी कर्करोग हे एक मुख्य कारण आहे. 2020 मध्ये या आजारामुळे 1 कोटीहून अधिक मृत्यू झाले आहेत. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यांची नोंदही झाली नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एकट्या भारतात कॅन्सरची सुमारे 14 लाख नवीन प्रकरणे आढळली आणि सुमारे 9 लाख लोकांनी या आजारामुळे आपला जीव गमावला आहे.

New Cancer Vaccine
Shetkari Andolan: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर आज निघणार तोडगा? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com