

Russia Threatens India: युक्रेनसोबतच्या युद्धामुळे जगापासून एकाकी पडलेला रशिया भारतावर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये (FATF) सहकार्य करण्यासाठी दबाव आणत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, रशियाने म्हटले आहे की, जर भारताने रशियाला एफएटीएफच्या 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समाविष्ट होण्यापासून वाचवले नाही, तर ते भारतासोबतचे संरक्षण आणि ऊर्जा करार संपुष्टात आणतील.
'एफएटीएफ' (Financial Action Task Force) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जी आंतरराष्ट्रीय आर्थिक गुन्हे रोखण्याचा प्रयत्न करते. एफएटीएफच्या ब्लॅक किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या देशावर देखरेख वाढवली जाते आणि दिलेली आर्थिक मदत बंद केली जाते.
ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, पडद्यामागे रशिया भारतासह ग्लोबल साउथच्या अनेक देशांना एफएटीएफ यादीतून वाचवण्यासाठी दबाव आणत आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स जूनमध्ये रशियाचा 'ब्लॅक लिस्ट' किंवा 'ग्रे लिस्ट'मध्ये समावेश करू शकते, असे बोलले जात आहे. (Latest Marathi News)
या अहवालात म्हटले आहे की, आर्थिकदृष्ट्या एकाकी पडू नये म्हणून रशिया स्वतःला वाचवण्यासाठी भारताला संरक्षण आणि ऊर्जा करार संपवण्याची धमकी देत आहे.
वृत्तानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला रशियन राज्य एजन्सीने भारतीय समकक्षांना इशारा दिला होता की, जर एफएटीएने रशियाला ब्लॅक यादीत किंवा ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट केले, तर त्याचे ऊर्जा, संरक्षण आणि वाहतूक क्षेत्रात खूप गंभीर परिणाम होतील.
नाव न सांगण्याच्या अटीवर रशियन अधिकाऱ्याने ब्लूमबर्गला सांगितले की, "हा एक अतिशय गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे. ही एक प्रकारे अप्रत्यक्षपणे रशियाकडून देण्यात आलेली धमकी आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.