
पाटणा विमानतळावर मोठा विमान अपघात होता होता टळला. हे विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते पण टच पॉइंट चुकल्यामुळे विमानाने आकाशात ४ वेळा घिरट्या घातल्या. त्यामुळे विमानात असलेल्या १७३ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. प्रवासी प्रचंड घाबरले होते. हे विमान दिल्लीवरून पाटणाला येत होते. पायलटच्या सतर्कतेमुळे नंतर विमानाचे सुरक्षितपणे लँडिंग झाले. धावपट्टी छोटी आणि टचडाऊन झोनमध्ये उतरण्याच्या अडचणीमुळे या विमानाला अपघात झाला असता पण पायलटने वेळीच योग्य निर्णय घेतल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दिल्ली विमानतळावरून पाटणा येथे येणारे विमान क्रमांक 6E 2482 उड्डाण घेत असताना पायलटला धावपट्टीवर योग्य टच पॉइंट मिळाला नाही. त्यामुळे त्याला लँडिंग करता आले नाही. त्यानंतर या विमानाने पुन्हा वरच्या दिशेने उड्डाण केले या दरम्यान विमानाला हवेत चार वेळा फेऱ्या माराव्या लागल्या. त्यानंतर, पायलटने विमानाचे सुरक्षितपणे लॅडिंग केले. लँडिंगच्या वेळी विमानाने निश्चित टच डाउन झोन ओलांडल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जेव्हा विमानाचे लँडिग झाले तेव्हा त्याचा मुख्य लँडिंग गियर धावपट्टीला स्पर्श करत होता परंतु विमान निश्चित केलेल्या जागेच्या पलीकडे गेले होते. कदाचित पुढची धावपट्टी मर्यादित असल्याने पायलटने वेळेत थ्रॉटल केले आणि विमान पुन्हा हवेत उडवले.' या विमानातून १७३ जण प्रवास करत होते. टच पॉइंट न मिळालेल्यामुळे विमानाला खाली उतरवून पुन्हा हवेत उडवल्यामुळे सर्वच प्रवासी घाबरले. सर्वांचा श्वास अक्षरश: अडकला. पण विमानातील क्रू मेंबर्सने वेळीच योग्य निर्णय घेत घोषणा करत सर्व प्रवाशांना धीर दिला.
पाटणा विमानतळाची धावपट्टी छोटी असल्याचे सांगितले जात आहे. सध्या पाटणा विमानतळाच्या धावपट्टीची लांबी २,०७२.६४ मीटर आहे. तर ती किमान २४३८ मीटर असायला हवी. त्यामुळेच ती वाढवण्याची तयारी सुरू आहे. २९ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन केले. हे टर्मिनल जवळपास १२०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.