Father and daughters killed truck crash : तीन मुली अन् बापाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झालाय. चौथी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. गुजरातमधील गोधराजवळ शुक्रावारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक व्यक्ती आपल्या मुलींसोबत दुचाकीवरून निघाला होता, त्यावेळी भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला उडवले. अपघात इतका भयंकर होता की दुचाकीवरून सर्वजण दूर फेकले गेले. तीन मुली आणि बापाचा जागेवरच मृत्यू झाला.
गोधरा-वडोदरा महामार्गावर बायपासजवळ तृप्ती हॉटेलजवळ शुक्रवारी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगातील ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. एक मुलगी गंभीर जखमी आहे. मुलीवर गोधरा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय रजेंद्र चौहान हे आपल्या चार मुलींसह मोटारसायकलवरून गोधरा बायपासजवळील सरंगपूर गावी लग्न समारंभासाठी निघाले होते. त्यावेळी तृप्ती हॉटेलजवळ गोधरा बायपासवर असताना एका ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात जानू (९), मनीषा (१२) आणि वर्षा (१३) यांचा मृत्यू झाला. तर नयना (३) गंभीर जखमी आहे. नयनाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भयंकर होता की ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर मोटारसायकलवरील सर्वजण रस्त्यावर पडले. आजूबाजूच्या प्रवाशांनी आणि स्थानिकांनी त्यांची तातडीने मदत केली. रजेंद्र आणि त्यांच्या चार मुलींना गोध्रा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राजेंद्र आणि त्यांच्या तीन मुलींना मृत घोषीत केले. नयना हिच्यावर उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.