
अमृतसरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून वडिलांनी मुलावर, सुनेवर आणि बायकोवर गोळीबार केला. या घटनेत मुलाला तीन गोळ्या लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपीची सुन आणि बायको गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी खबरदारी दाखवत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पंजाबची राजधानी अमृतसर मध्ये निवृत्त सीआरपीएफ डीएसपी तरसेम सिंग याच्या घरात वैवाहिक आणि मालमत्तेवरून वाद झाल्याने संतप्त झालेल्या तरसेम सिंगने त्याच्या कुटुंबियांवर बंदुकीचा रोख धरला. त्याच्या मुलावर तीन गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्याचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडला. शिवाय तरसेम सिंगने त्याच्या बायको आणि सुनेवर देखील गोळ्या झाडल्या. या दोघींचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही संपूर्ण घटना मजिठा रोडवरील एका पोलिस ठाण्याजवळ घडली असून अशा परिस्थितीत पोलिसांनी तत्परता दाखवत त्या व्यक्तीला पकडले आणि ताब्यात घेतले. हा गोळीबार सकाळच्या सुमारास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा वाद घरगुती असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. घडलेल्या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत.अशा घटनांमधून मानवाच्या संयमाचा ताबा दिवसेंदिवस सुटत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.