Bombay HC On Remarriage of Widow: रस्ते अपघातात पतीचा मृत्यू, दुसरं लग्न केलं म्हणून पत्नीला नुकसान भरपाई नाकारू शकत नाही: HC

Bombay HC : न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकल खंडपिठाने हा निर्णय दिला आहे.
Bombay HC On Remarriage of Widow
Bombay HC On Remarriage of WidowSaam Tv
Published On

Bombay HC On Remarriage of Widow : एका तरुणाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता पण त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे ती नुकसानभरपाईचा दावा करू शकत नाही, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. विमा कंपनीची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

विधवा महिलेने पुनर्विवाह केला, हे मोटार वाहन कायद्यांतर्गत नुकसान भरपाई नाकारण्याचे कारण ठरु शकत नाही. न्यायमूर्ती एस.जी. डिगे यांच्या एकल खंडपिठाने हा निर्णय दिला आहे. (Latest Marathi News)

Bombay HC On Remarriage of Widow
Aadvay Hiray News : ठाकरे गटाच्या उपनेत्यासह 32 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण

मृत पतीच्या अपघाताची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी विधवेला आयुष्यभर किंवा नुकसान भरपाई मिळेपर्यंत विधवा राहावे, अशी अपेक्षा करू शकत नाही. तिचे वय लक्षात घेता आणि अपघातावेळी ती मृताची पत्नी होती, इत्यादी बाबी नुकसान भरपाई मिळवण्यास पात्र असल्याचे सिद्ध करण्यास पुरेशा आहेत. त्याशिवाय पतीच्या मृत्यूनंतर विधवा माहीलेने पुनर्विवाह केल्यानंतर विमा कंपनी नुकसान भरपाई नाकारू शकत नाही, असे न्या. डिगे यांनी म्हटले आहे.

Bombay HC On Remarriage of Widow
Palghar News: मोठी बातमी! पालघर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट; बोटीत पाकिस्तानी नागरिक

न्यायालयाने सांगितले की, पतीच्या मृत्यूच्या वेळी महिलेचे वय 19 वर्षे होते. तिचे वय लक्षात घेता आणि अपघाताच्या वेळी ती मृत व्यक्तीची पत्नी होती ही वस्तुस्थिती लक्षात घेता, तिच्याकडे नुकसान भरपाईसाठी पात्र होण्यासाठी पुरेसे कारण आहे. शिवाय, पतीच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पुनर्विवाहास प्रतिबंध करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

2010 मध्ये गणेशचा मृत्यू झाला

महिलेचा पती गणेश मे 2010 रोजी मोटारसायकलवरून मुंबई-पुणे महामार्ग ओलांडून कामशेतला जात होता. दरम्यान, पाठीमागून आलेल्या ऑटोरिक्षाने त्याला धडक दिल्याने गणेश जागीच ठार झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com