Palghar News: मोठी बातमी! पालघर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली संशयास्पद बोट; बोटीत पाकिस्तानी नागरिक

Palghar Beach News: भारतीय नौसेना क्षेत्रात संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे..
Palghar Beach News
Palghar Beach NewsSaamtv
Published On

सचिन निकम, प्रतिनिधी..

Palghar News: पालघरच्या (Palghar Beach) समुद्र किनाऱ्याजवळ संशयास्पद बोट आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बोटीवर पाकिस्तानी नागरिक असल्याचेही समोर आले आहे. मुंबईच्या जवळील ही घटना आहे. भारतीय नौसेना क्षेत्रात आढळली संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. नौदल आणि तटरक्षक दलाकडून बोटीची तपासणी सुरू आहे. (Latest Marathi News)

Palghar Beach News
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, फिटमेंट फॅक्टरबाबत केंद्राची मोठी अपडेट

याबा.बत अधिक माहिती अशी की, मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ आज एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट रायगडच्या किनारपट्टीवर आढळल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

२६-११ च्या हल्लानंतर समुद्रातील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणाऱ्या तपास यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना आणि इतर एजेन्सींला एक संशयास्पद बोट मुंबई किनाऱ्याजवळ असल्याची माहिती देण्यात आली. पोलिस तपासात या ठिकाणी आढळलेली बोट पाकिस्तानी (Pakistani) असून त्यामध्ये दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.

Palghar Beach News
Gadchiroli News : गडचिरोलीच्या जंगलात पोलीस - नक्षलवाद्यांत चकमक, नक्षली ठार; SP Neelotpal यांनी दिली माहिती (पाहा व्हिडीओ)

ही धक्कादायक बातमी समोर आल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. यानंतर या बोटीचा शोध घेतला जात आहे. मुंबई पोलिसांची सागरी पोलिस टीम या बोटीचा शोध घेत आहे. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उरण येथील करंजाजवळच्या समुद्रात संशयास्पद मासेमारी बोट सापडली होती. विनानंबरप्लेट असलेली बोट सापडल्याने बोट ताब्यात घेण्यात आली. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही बोट सापडली. डिझेल चोरीसाठी बोट वापरण्यात येत असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त केला जात होता. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com