Mumbai News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (RBI) नोकरी मिळवण्याचे स्वप्न राहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या तरुणाचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण आरबीआयमध्ये ग्रेड 'बी' अधिकारी पदाच्या 291 रिक्त जागांसाठी भरती (RBI Recruitment 2023) केली जाणार आहे. यासंदर्भात आरबीआयने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, आरबीआयमध्ये ऑफिसर ग्रेड B (DR) जनरल PY 2023, ऑफिसर ग्रेड B (DR) डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिसी रिसर्च (DEPR) आणि ऑफिसर ग्रेड B (DR) स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट (DSIM) या पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. आरबीआय बँक देशभरात एकूण 291 रिक्त जागांसाठी भरती करणार आहे. त्यापैकी 222 रिक्त पदे अधिकारी ग्रेड बी जनरल पदांसाठी असणार आहे.
9 मे 2023 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. तसंच, उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या आधारे केली जाईल. ही निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी आरबीआयने जारी केलेली अधिकृत अधिसूचना वाचावी.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणारी तारीख - 9 मे 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 9 जून 2023
अधिकारी ग्रेड बी जनरल - 238 पदे
अधिकारी ग्रेड बी DEPR - 38 पदे
अधिकारी ग्रेड बी DSIM – 31 पदे
अधिकारी ग्रेड बी (डीआर) - (सामान्य) -
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
अधिकारी ग्रेड बी (DR) DEPR-
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अर्थशास्त्र / अर्थमिती / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
अधिकारी ग्रेड बी (DR) DSIM -
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार आयआयटी खरगपूरमधून सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/गणितीय अर्थशास्त्र/अर्थमिति/सांख्यिकी आणि माहिती शास्त्रात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
अधिकारी ग्रेड बी - 55,200 रुपये प्रति महिना
अधिकारी ग्रेड बी (DR) DEPR - 44,500 रुपये प्रति महिना
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.