RBI Hikes Repo Rate: सर्वसामान्यांना पुन्हा जोर का झटका, होम-कार लोन महागल्यानं EMI 'इतका' वाढणार

आरबीआयनं या वर्षात सर्वसामान्यांना वारंवार मोठे झटके दिले आहेत. आता पुन्हा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या वर्षातील ही पाचवी दरवाढ आहे.
RBI hikes repo rate
RBI hikes repo rateSAAM TV

RBI hikes repo rate, RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँकेनं (RBI) या वर्षी सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये ०.३५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. आधीच महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा झटका आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, आता रेपो रेट ५.९० टक्क्यांवरून वाढून तो ६.२५ टक्के होईल. या निर्णयामुळं गृहकर्ज आणि वाहनकर्जासह इतर कर्जेही महागणार आहेत. एमपीसी बैठकीनंतर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी ही माहिती दिली. (Latest Marathi News)  

देशातील सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. या वर्षातील ही पाचवी दरवाढ आहे. यानंतर गृह, वाहन, वैयक्तिक कर्जांसह इतर कर्जेही महागणार आहेत. सर्व कर्जे महाग झाल्याने कर्जदारांना वाढीव ईएमआय भरावा लागणार आहे. (Home Loan)

RBI hikes repo rate
आता स्टेट बँकेची कर्जे ऑक्टोबरपासून होणार  स्वस्त

वर्षभरात २.२५ टक्क्यांची वाढ

या वर्षीच्या अखेरच्या महिन्यात रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. या वाढीसह रेपो रेट ६.२५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. यावर्षी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात एकूण २.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं की, महागाई दर ६ टक्के निश्चित करण्यात आला आहे. तो कमी करायचा आहे.

RBI hikes repo rate
Home Loan Offer : वाढत्या व्याजानुसार 'या' बँकेने केले कर्ज स्वस्त, आता कमी दरात मिळणार !

रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानं ईएमआयवर काय होणार परिणाम?

रेपो रेटवर आधारित आरबीआय बँकांना कर्जपुरवठा करते. रेपो रेट कमी झाले तर, ईएमआयमध्ये घट होते. तर रेपो रेटमध्ये वाढ झाली तर, कर्जे महाग होतात. आता रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने कर्जेही महागणार आहेत. तसेच कर्जदारांच्या ईएमआयचा हप्ताही महागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com