Video : मंचावर हनुमानाची मूर्ती, समोर तोकड्या कपड्यात तरुणींची बॉडी बिल्डिंग; रतलाममधील स्पर्धा वादात

Ratlam Body Building Competition Video: स्टेजवरील हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला स्पर्धकांनी टू पिसमध्ये बॉडीबिल्डिंग करणे याला काँग्रेसने अश्लीलता म्हटले आहे.
Ratlam Body Building Competition News
Ratlam Body Building Competition Newssaam tv
Published On

Ratlam Body Building Competition News: रतलाम शहरात रविवारी झालेल्या 13व्या ज्युनियर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत महिला स्पर्धकांच्या स्टेजवरील परफॉर्मन्सवरून वाद निर्माण झाला आहे. या वादाचं कारण स्पर्धेवेळी मंचावर असलेली हनुमानाची मूर्ती आहे. स्टेजवरील हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला स्पर्धकांनी टू पीसमध्ये बॉडीबिल्डिंग करणे याला काँग्रेसने अश्लीलता म्हटले आहे.

चॅम्पियनशिपच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महापौर यांनी सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने रतलाममध्ये झालेल्या नॅशनल बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपला गचाळ असे म्हटले आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे.

Ratlam Body Building Competition News
Imtiyaz Jaleel : औरंगजेबाची कबर हलवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

बजरंग बालीच्या पुतळ्यासमोर झालेल्या महिला बॉडीबिल्डरच्या स्पर्धेचा निषेध करत काँग्रेसने धान मंडी परिसरात हनुमान चालिसाचे पठण केले. विशेष म्हणजे भाजप सरकारचे माजी गृहमंत्री हिम्मत कोठारी हेही या आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेसने हा कार्यक्रम ज्या सभागृहात झाला ते ठिकाण गंगेच्या पाण्याने धुतले. दरम्यान काही हिंदू संघटनांनीही या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. (Latest Marathi News)

रतलाम येथील आमदार सभागृहात रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील शरीरसौष्ठवपटूंसह सुमारे 350 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महापौर प्रल्हाद पटेल यांनी कन्या व हनुमानजींच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम प्रल्हाद पटेल आयोजन समिती आणि रतलाम बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांनी आयोजित केला होता.

Ratlam Body Building Competition News
Khushbu Sundar: 'मी आठ वर्षाची होते अन्...' भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे वडिलांवर गंभीर आरोप; सांगितला धक्कादायक अनुभव

याठिकाणी आयोजक महापौर प्रल्हाद पटेल आणि भाजप नेत्यांनी विहित कपड्यांमध्येच सहभागी व्हावे, असे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणात भाजप नेत्यांनी फेसबुकवर काँग्रेस समर्थकांवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांचा हवाला देत गुन्हा दाखल करण्यासाठी औद्योगिक क्षेत्र पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गोंधळ उडाला. (Latest News In Marathi)

महापौर म्हणाले, यात काय चूक झाली?

महापौर प्रल्हाद पटेल म्हणाले, शहरातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आम्ही सभागृह गंगाजलाने धुवू असे सांगितले होते. पवित्र तर त्याचा आत्मा करावा लागेल असा पलटवार त्यांनी केला. तसेच त्यांचे डोळे आणि त्यांचे विचार गंगेच्या पाण्याने धुवावे लागतील असेही ते म्हणाले. जे शिक्षक राहिले आहेत, ज्यांनी मुलांना शिकवले त्यांना 54 वर्षीय महिलेच्या आत अश्लीलता दिसत आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com