Ranchi News : झारखंडच्या रांचीमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. २१ दिवसांच्या मुलीच्या पोटात एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना आठ भ्रूण आढळून आले आहेत. या भ्रूणांचे आकार तीन ते पाच सेंटीमीटर आहेत. या सर्व भ्रूण पोटातील गाठीत आढळून आले, अशी माहिती डॉ. मोहम्मद इमरान यांनी दिली. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार,सदर बाळाचा १० ऑक्टोबर रोजी जन्म झाला होता. त्यावेळी तिचे पोट दु:खत होते. डॉक्टरांनी तपासले तेव्हा दिसून आले की, मुलीच्या पोटात एक गाठ आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार मुलीच्या घरचे २१ दिवसानंतर रुग्णालयात घेऊन पोहोचले. तेव्हा डॉक्टरांनी (Doctor) शस्त्रक्रिया करून गाठ काढण्याचा निर्णय घेतला.
मात्र, शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना मोठा धक्काच बसला. मुलीच्या गाठीमध्ये आठ भ्रूण आढळून आले. शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकल्यानंतर मुलीची प्रकृती स्थिर आहे. मुलीला एका आठवड्यानंतर रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात येईल.
रांची स्थित राणी चिल्ड्रेन रुग्णालयाचे (Hospital) प्रमुख राजेश सिंहचे म्हणणे आहे की, 'सदर प्रकरण विचित्र असल्यामुळे हा प्रकार एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्याची तयारी सुरू आहे.
'जर्नल ऑफ नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन'च्या नुसार या स्थितीला 'फीट्स इन फेटू' म्हटलं जाते. डॉ. इमरानच्या म्हणण्यानुसार 'एफआईएफ'च्या प्रकरणामध्ये आठ भ्रूण आढळण्याचे एकही प्रकरण समोर आलेलं नाही. हे विचित्र प्रकरण १० लाख मुलांमधून एका मुलाला होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.