मुंबई : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (All India Institute of Medical Sciences) विद्यार्थ्यांनी सादर केलेली रामलीला वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या विद्यार्थ्यांनी सादरीकरणामध्ये जे संभाषण केलं आहे त्यामध्ये हिंदू देव देवतांबद्दल एकेरी तसेच असभ्य भाषेत संवाद साधले आहेत. या सादरीकरणावरुन आता चांगलच राजकारण तापलं आहे. हे सादरीकरण करताना असभ्य वर्तन आणि संभाषण केलं आहे. रामायणातील सर्व पात्रांची खिल्ली उडवली आहे त्यामुळे या मुलांच्या अटकेची मागणी करत एम्स (AIIMS) संस्थेवरती देखील कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वादी संघटनांकडून करण्यात येत आहे. (Ramlila presented by AIIMS students in the controversy)
पहा व्हिडीओ -
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या (Freedom of expression) नावाखाली कोणी काहीही करणार का आणि हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर असल्याचही मत व्यक्तं केल जात आहे. तसेच या सादरीकरणामध्ये राम, लक्ष्मण, सिता (Ram Laxaman Sita) ही पात्र दाखवले असून त्यांच्या बाबत असभ्य भाषेत संभाषण करण्यात आलं आहे पात्राच्या तोंडी असलेले संवाद तसेच यामध्ये हिंदी सिनेमा मधील डायलॉग वापरुन इतिहासाचे तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे.
एम्स संस्थेवरतीच तक्रार करणार
AIIMS मध्ये जाणूनबुजून केलेला हा प्रकार आहे. या विद्यार्थ्यांना आमच्या धर्माबद्द्ल असभ्य भाषेत बोलण्याचा अधिकार काय ? आमच्या देव देवतांचा अपमान करण्याचा अधिकार काय? असं वक्तव्य ब्राह्मण महासंघ अध्यक्ष आनंद दवे Anand Dave यांनी केलं आहे. उद्या पुण्यातील पोलिस चौकीमध्ये जाऊन एम्स संस्थेवरतीच तक्रार दाखल करणार असल्याच ते म्हणाले आहेत. नाहीतर एम्सने त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार -
ही अतिशय गंभीर आणि संतापजनक गोष्ट आहे. अशा उच्चशिक्षित संस्थांमध्ये भारतामधील सांस्कृतिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अशा महत्वपूर्ण बाबींचा अशा प्रकारचा अपमान होत असेल तर हे अतिशय संतापजनक असल्याचे मत भाजपा आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले BJP's Tushar Bhosale यांनी व्यक्त केलं आहे. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी य़ा विद्यार्थ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी विनंती आम्ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे (Union Health Minister) करणार असल्याचही ते म्हणाले
दरम्यान अशा पद्धतीने धर्माचा अपमान करणे हे आम्हाला मान्य नाही, या गोष्टीचा निषेध करतो असं वक्तव्यं कॉग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी Atul Londhe केलं आहे. दरम्यान या घडलेल्या घटनेबाबत त्या विद्यार्थ्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याच समजत आहे. तरीही सोशल मिडीयावरती Social Media मात्र या विद्यार्थ्यांविरोधात चांगलाच रोष पहायला मिळत आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.