Rameshwaram Cafe Blast
Rameshwaram Cafe Blast

Rameshwaram Cafe Blast: रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटाचा सूत्रधाराला अटक; NIA कडून ३ राज्यांतील १८ ठिकाणी छापे

Rameshwaram Cafe Blast: एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, मुझम्मिल शरीफ याने स्फोटात दोन आरोपींना मदत केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. ब्रूकफिल्ड परिसरातील आयटीपीएल रोडवर करण्यात आलेल्या स्फोटासाठी वापरण्यात आलेले स्फोटक त्याने पोचवले होते.

Rameshwaram Cafe Blast Master Mind Arrested By NIA :

बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटप्रकरणी तपास यंत्रणा एनआयएला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुझम्मिल शरीफ याला एनएआयने अटक केलीय. एनआयए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,शरीफला पकडण्यासाठी कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये १८ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.(Latest News)

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीफला पकडण्यासाठी तपास यंत्रणेच्या पथकाने कर्नाटक, तमिळनाडू, आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यातील १८ ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

शरीफ हा या प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्विर शाजिब हुसेनचा सहकारी आहे. दोघांनी मिळून हा स्फोट घडवून आणला होता. १ मार्च रोजी बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला होता. या दुर्घटनेत एकूण १० जण जखमी झालेत. एनआयएने ३ मार्च रोजी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. सध्या या प्रकरणात अब्दुल मतीन ताहा नावाचा आणखी एक सूत्रधार असून तो सध्या फरार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

मुझम्मिल शरीफने स्फोट घडवणाऱ्या दोन आरोपींची मदत केली. त्याने ब्रुकफील्ड परिसरातील आयटीपीएल रोडवर करण्यात आलेल्या स्फोटासाठी वापरण्यात आलेली आयईईडी स्फोटकं पोहोचवली होती. दरम्यान कॅफेत स्फोट झाल्याची घटना घडल्यानंतर तो काही वेळ बेंगळुरुमध्येच होता. घटनेनंतर तो तेथून फरार झाला. तो वारंवार आपले ठिकाण बदलत होता आणि मोबाईलचा उपयोग करणं तो टाळत होता असं एनआयएच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी तपास यंत्रणेने गुरुवारी अनेक ठिकाणी छापे टाकले. आरोपींच्या घरी, दुकानात आणि इतर ठिकठिकाणी छापे टाकण्यात आली. एनआयएच्या पथकाने आरोपींच्या ठिकाणाहून अनेक डिजिटल उपकरणे आणि रोख रक्कम जप्त केलीय. या प्रकरणाशी संबंधित अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Rameshwaram Cafe Blast
Bengaluru Blast: बेंगळुरूच्या रामेश्वरम कॅफेमध्ये मोठा स्फोट; अनेकजण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com