Sanjiv Bhatt : माजी IPS अधिकारी संजीव भट्ट यांना २० वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?

Sanjeev Bhatt Latest News in marathi : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना काल गुरुवारी २० वर्षांची शिक्षा आणि २ लाखांचा दंड सुनावला . संजीव भट्ट यांना पालनपूरमधील १९९६ च्या एनडीपीएस प्रकरणात ही शिक्षा सुनावली.
Sanjeev Bhatt
Sanjeev Bhatt Saam tv

Sanjeev Bhatt Latest News :

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना कोर्टाने गुरुवारी २० वर्षांची शिक्षा आणि २ लाखांचा दंड सुनावला . संजीव भट्ट (Sanjiv Bhatt) यांना पालनपूरमधील १९९६ च्या एनडीपीएस प्रकरणात ही शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर पोलिसांनी पालनपूरमधील तुरुंगात नेलं. दोन दिवसांपूर्वी कोर्टानं एनडीपीएस कायद्यांतर्गत दोषी जाहीर केलं होतं. कोर्टाच्या निर्णयानंतर भट्ट यांचे वकील उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

संजीव भट्ट यांना गुरुवारी कोर्टात शिक्षा सुनावली. यावेळी त्यांच्या पत्नी श्वेता भट्ट या देखील उपस्थित होत्या. कोर्टाच्या निकालानंतर त्यांना माध्यमांशी संवाद साधताना अनेक सवाल उपस्थित केले.

श्वेता भट्ट म्हणाल्या, 'आम्हाला निष्पक्षपणे भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही. ज्या व्यक्तीला अंमलीपदार्थ पकडण्यासाठी बक्षीस देण्यात आलं. त्याच्या जबानीवरून आमच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. मागील ४.५ वर्षात न्यायाधीशाचीही बदली झालेली नाही. आम्ही प्रत्येक मुद्दे मांडले. पण आमचं ऐकलं गेलं नाही. हे प्रकरण चुकीचं आहे'.

Sanjeev Bhatt
Rameshwaram Cafe Blast: रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोटाचा सूत्रधाराला अटक; NIA कडून ३ राज्यांतील १८ ठिकाणी छापे

वकिलाला एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

संजीव भट्ट यांनी १९९६ साली राजस्थानच्या (Rajasthan) एका वकिला अंमलीपदार्थ बाळगल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी पालनपूरमधील एका हॉटेलमध्ये छापा मारला. त्यावेळी या हॉटेलमधील एका रुममध्ये वकील सुमेरसिंह राजपुरोहित थांबले होते. त्यांच्या रुममध्ये अंमलीपदार्थ आढळल्याचा आरोप संजीव भट्ट यांनी केला होता. त्यावेळी भट्ट हे बनासकांठाचे पोलीस अधीक्षक होते.

Sanjeev Bhatt
Mafia Don Mukhtar Ansari : मोठी बातमी! माफिया डॉन मुख्तार अन्सारीचं निधन, तुरुंगात आला होता हार्ट अटॅक

हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीआयडीची तपासणी

२०१८ साली गुजरात (Gujarat) हायकोर्टाने या प्रकरणात अंमलीपदार्थ कोणी आणलं? कुठून आणलं आणि हॉटेलपर्यंत कोणी पोहोचवलं? याचा तपास करण्याचा आदेश गुजरात हायकोर्टाने सीआयडी क्राइमला दिला होता. या आधारावर तपास करण्यासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आली होती.

या प्रकरणी संजीव भट्ट आणि तत्कालीन एल.सी.बी पोलीस निरीक्षक आणि आता सेवानिवृत्त डीएसपी आयबी व्यास यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर २०१९ मध्ये कोर्टात या प्रकरणातील आरोपींच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com