Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra Das: राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं निधन

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री सत्येंद्र दास यांचे निधन झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला.
Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra Das: राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं निधन
Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra DasSaam Tv
Published On

अयोध्याच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचे निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे महंत सत्येंद्र दास यांची प्रकृती बिघडली होती. रविवारी त्यांना लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी श्री सत्येंद्र दास यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर गंभीर अवस्थेत न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra Das: राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं निधन
Ram Mandir Inauguration: मिरा-भाईंदरमध्ये २२ जानेवारीला मांस विक्रीची दुकाने बंद राहणार; पालिकेने घेतला मोठा निर्णय

महंत सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे परम रामभक्त, मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. विनम्र श्रद्धांजली!'

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा सत्येंद्र दास तात्पुरत्या राम मंदिराचे पुजारी होते. राम मंदिराचे सर्वात जास्त काळ मुख्य पुजारी राहिलेले सत्येंद्र दास यांनी आध्यात्मिक जीवनाचा पर्याय निवडला. तेव्हा ते फक्त २० वर्षांचे होते. अयोध्येत आणि इतर राज्यात देखील त्यांचा मोठ्याप्रमाणात आदर केला जातो. त्यांच्या निधनामुळे अनेकांना मोठा धक्का बसला.

Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra Das: राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं निधन
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचा ग्राऊंड फ्लोअर तयार; अयोध्या परिसरात कुठे काय असणार? जाणून घ्या एका क्लिकवर

निर्वाणी आखाड्याशी संबंधित असलेले सत्येंद्र दास हे अयोध्येतील सर्वात सुलभ संतांपैकी एक होते. अयोध्या आणि राम मंदिरातील घडामोडींबद्दल माहिती मिळवण्यासाठी देशभरातील अनेक माध्यमांशी संपर्क साधणारे ते एक व्यक्ती होते. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा त्यांनी ९ महिने मुख्य पुजारी म्हणून काम करत होते. सत्येंद्र दास यांनी नेहमीच राम मंदिर चळवळ आणि पुढील वाटचालीबद्दल माध्यमांच्या सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरे दिली. विध्वंसानंतरही, सत्येंद्र दास मुख्य पुजारी म्हणून काम करत राहिले आणि राम लल्लाची मूर्ती तात्पुरत्या तंबूखाली स्थापित केली तेव्हा त्यांनी पूजाही केली होती.

Ram Mandir Chief Priest Mahant Satyendra Das: राम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांचं निधन
Ram Mandir Darshan Time Table: तुम्हालाही रामलल्लाचं दर्शन करायचं आहे? जाणून घ्या दर्शन आणि आरतीच्या वेळा काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com