चेन्नई: राजकारण प्रवेशावरुन सुपरस्टार रजनीकांत यांच्या चांगल्याच चर्चा सुरु आहेत. त्यांच्या चाहत्यांमधून तसेच राजकीय विश्लेषकांसह अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र आता तर्क-वितर्कांना पूर्णविराम लागला आहे. Rajinikanth said said no plan to return to politics
राजकारणाला दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी पूर्णविराम दिला आहे. तसेच आपली राजकारणात पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता नाही. असे स्पष्ट करत असताना रजनीकांत यांनी ‘रजनी मक्कल मंद्रम’ RMM हा राजकीय पक्ष देखील विसर्जित करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. Rajinikanth said said no plan to return to politics
‘रजनी मक्कल मंद्रम’ हा पक्ष संपूर्ण विसर्जित करण्यात येत आहे. यापुढे कार्यरत राहणार नाही. हा पक्ष अस्तित्वात राहणार नसल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या पुढे भविष्यात राजकारण मध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही योजना नाही. या राजकारणात मी येणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे.
हा निर्णय घेण्यापूर्वी पार्टी मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रजनीकांत यांनी बैठक घेतली आहे. त्यात त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी हा निर्णय रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर जाहीर केला. रजनीकांत यांनी सांगितले कि, भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही". त्यांची रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.