Crime News: गर्लफ्रेंडचा रुसवा काढण्यासाठी खूप काही केलं...अखेर नाराज बाॅयफ्रेंडने मित्राला बोलवलं अन् घडलं भयंकर

काही कारणास्तव दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Couple Relationship Tips
Couple Relationship TipsFile Photo
Published On: 

Rajasthan Crime News: राजस्थानमधील नागौरमध्ये एका तरुणाने प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्यानंतर तिची हत्या केली. ही घटना उंचेडा गावातील असून, रविवारी दुपारी तरुणाने आपल्या मित्रासह तरुणीची हत्या केली. काही कारणास्तव दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Couple Relationship Tips
Manipur Violence: शिंदे-फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; मणिपूरमध्ये अडकलेले २५ विद्यार्थी सुखरूप परतले

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून बडी खाटू पोलिसांनी (Police) आरोपी प्रियकराला २४ तासांत अटक (Arrest) केली. उंचेडा गावातील रहिवासी देवेंद्र यांनी बडी खाटू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, ७ मे रोजी त्यांचा लहान भाऊ विकास याने फोन करून त्यांची बहीण रक्तबंबाळ अवस्थेत आढल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून प्रियकर आपल्या प्रियसीची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू होता. या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण संशयास्पद आढळले

फिर्यादीत अज्ञात व्यक्तींवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशन ऑफिसर हरीश सांखला यांनी सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक राममूर्ती जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असते दोन जण संशयास्पद आढळले आहे. (Crime News)

Couple Relationship Tips
Pune Crime Branch News: पुणे- सोलापूर महामार्गावर कोट्यवधी रुपयांनी भरलेल्या ६ बॅगा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

यानंतर प्रकाश नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने महिला ही आपली गर्लफ्रेंड असल्याचे मान्य केले. काही कारणाने त्यांचे नाते तुटले होती आणि तो तिला खूप दिवसांपासून मानव्याच्या प्रयत्न करत होता.

आरोपीने सांगितले की, जेव्हा ती पुन्हा नात्यात येण्यासाठी तयार होत नव्हती तेव्हा त्याने त्याच्या मित्रासोबत मिळून गर्लफ्रेंडची हत्या करण्याचा कट रचला. मुलगी घरी एकटी असताना त्याने तिची लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com