Bhilwara News: राजस्थान हादरला! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळलं

Rajasthan Police: याप्रकरणी पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
Bhilwara News
Bhilwara NewsSaam Tv
Published On: 

Rajasthan Crime News: बकरी चारण्यासाठी जंगलामध्ये गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (physically assaulted) करुन कोळशाच्या भट्टीमध्ये तिला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये (Rajasthan Crime News) घडली आहे. संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही घटना राजस्थानच्या भीलवाडामध्ये (Bhilwara) घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. या घटनेचा तपास राजस्थान पोलिसांकडून सुरु आहे.

Bhilwara News
Thane News: एवढं कुठं मारतात का? NCC च्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढलं; जोशी बेडेकर कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील कोटडी पोलीस स्टेशन हद्दीतील नरसिंहपुरा गावामध्ये ही घटना घडली आहे. या गावामध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी आपल्या आईसोबत बकऱ्या चारण्यासाठी जंगलामध्ये गेली होती. दुपारी जेवण तयार करण्यासाठी तिची आई घरी निघून आली पण मुलगी तिथच थांबली. पण संध्याकाळ झाली तरी मुलगी घरी आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह गावातील ग्रामस्थांनी आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला.

Bhilwara News
Archana Gautam On MC Stan Fans : बिग बॉसचा सेट जाळण्याची धमकी दिली म्हणून... अर्चना गौतमचा मोठा खुलासा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरसिंगपुरा गावात या प्रकरणी मुलीचा शोध घेण्यात आला. गावात न सापडल्याने जंगलात शोध सुरू केला. कालबेलिया समाजाने जंगलामध्ये चार ते पाच भट्ट्या तयार केल्या होत्या. यामधील एका कोळशाच्या भट्टीतून धूर निघताना दिसल्यावर गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी कोळशाच्या भट्टीजवळ जाऊन शोध घेतला तर त्याठिकाणी त्यांना मुलीच्या हातातील बांगड्या आणि चप्पल दिसून आली. त्यामुळे त्यांनी मुलीवर अत्याचार करुन तिचला भट्टीमध्ये जीवंत जाळल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

Bhilwara News
Delhi Services Bill: नेहरू, पटेल आणि आंबेडकरांनी दिल्लीला पूर्ण राज्य करण्यास विरोध केला होता: अमित शाह

त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. भीलवाडा येथील या खळबळजनक घटनेनंतर कोत्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अतिरिक्त एसपींनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा कसून तपास पोलिसांकडून सुरु आहे. भीलवाडा एसपी आदर्श सिद्धू यांनी सांगितले की, मुलीची हत्या आणि जाळल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पुरावे देखील सापडले आहेत. मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. चारपैकी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.