CM Convoy Accident: मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याला अपघात, 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 7 जण जखमी

CM Bhajanlal Sharma Convoy Accident : राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्यातील एका कारला अपघात झाला. या अपघातात पाच पोलिसांसह सात जण जखमी झालेत . या घटनेचा तपास पोलिसांनी तीव्र केला आहे.
CM Convoy Accident
CM Bhajanlal Sharma Convoy Accident X
Published On

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याला अपघात झाला. एका रस्ते अपघातात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन उलटल्याने हा अपघात झालाय. यात 5 पोलिसांसह 7 जण जखमी झालेत. सीएम भजनलाल शर्मा यांनी स्वतः सर्व जखमींना रूग्णालयात दाखल केलंय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्याचा अपघात हा जयपूरच्या जगतपुरा येथील एमआयआर अक्षय पत्र चौरस्त्याजवळ झाला. मुख्यमंत्र्याचा ताफा कुठे तरी जात होता. त्यावेळी त्यांच्या वाहनातील एका कार दुसऱ्या एका कारला धडकली. धडकेमुळे एक कार उलटली. अपघात झाल्यानंतर तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याचदरम्यान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे आपल्या कारमधून खाली उतरले आणि त्यांनी अपघातात जखमी झालेल्यांना स्वत: मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात दाखल केलं.

या अपघातात पाच पोलीस कर्मचारी आणि अन्य दोन जण गंभीर जखमी झालेत. सीएम भजनलाल शर्मा यांनी जखमींना ताफ्यात आणि स्वत:च्या वाहनांमध्ये बसवून रूग्णालयात नेले. त्यांनी सर्व जखमींना महात्मा गांधी रूग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात ताफ्याच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

CM Convoy Accident
Mumbai Bus Accident : BEST चा वाईट काळ! ८ महिने, १४ ठिकाणं, वेळ रात्रीचीच; अपघातांत २० जणांचा बळी

कुठे जात होता मुख्यमंत्र्यांचा ताफा

राज्यसभेचे उपाध्यक्ष जगदीप धनखड हे बुधवारी जयपूरमध्ये श्री सोहन सिंग मेमोरियल स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. सीएम भजनलाल शर्मा हे देखील उपराष्ट्रपतींच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार होते, मात्र त्याआधीच त्यांच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी दुपारी जयपूरच्या एनआरआय चौरस्त्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनांना एका हायस्पीड एर्टिंगा कारची धडक बसली. या अपघातात इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.

CM Convoy Accident
Sangli Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, प्रवासी जीपची दुचाकीला धडक; आईसह २ मुलांचा मृत्यू

अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात दोन बोलेरो आणि एक अर्टिगा खराब झालेले दिसत आहेत. मुख्यमंत्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना एनआरआय सर्कलजवळ कार वाचवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन रस्त्यावर बांधलेल्या 'डिव्हायडर'वर आदळल्याचं म्हटलं जातंय. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना अचानक समोरून एर्टिगा कार आल्याने ताफ्यातील वाहनांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर एक बोलेरो दुभाजकाला धडकली तर दुसरे वाहन पोलिसांच्या बॅरिकेडिंगला धडकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com