

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका महिला क्लास शिक्षिकेचा मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. याप्रकरणी खुलासा करताना पोलिसांनी शिकवणी शिक्षकेची हत्या झाल्याचे सांगितले आहे. पोलीसांनी पुढे सांगितले की महिलेचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळेच आरोपीने महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका प्लास्टिकच्या गोणीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. अज्ञातांनी महिलेची हत्या करून मृतदेह येथे टाकला होता. पोलिसांनी मृतदेह तातारपूर सीएचसीच्या शवागारात ठेवला आहे. तातारपूर पोलिसांच्या तपासात ही महिला 29 वर्षीय असून ती दिल्लीची रहिवासी आहे. प्रियांका दिल्लीतील कापड व्यापारी कपिल गुप्ता यांच्या घरी मुलांना शिकवण्यासाठी जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
कपिल गुप्ता आणि प्रियांका यांची मैत्री झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्यानंतर प्रियांकाने लग्नासाठी दबाव टाकला आणि 50 लाख रुपयांची मागणी केली. प्रियांकाला ब्लॅकमेल केल्यानंतर कपिल गुप्ताने तिच्या हत्येचा कट रचला होता. कपिल गुप्ता (३९), त्याची पत्नी सुनैना गुप्ता (३८) नोकर राजकिशोर यादव (२४) रा. गाझियाबाद आणि सचिन देवल (२३, रा. दिल्ली) यांनी मिळून प्रियांकाची हत्या करून तिचा मृतदेह राजस्थानमध्ये फेकून दिला.
प्रियांकाने दिल्लीतील गांधीनगर येथील बँकेतून पैसे काढले होते, मात्र त्यानंतर ती घरी परतली नसल्याचे तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, बीटीएस डेटा आणि इतर स्त्रोतांच्या मदतीने प्रियांकाचा मृतदेह दिल्लीहून कारने आणून इंद्र बस्ती पुलाखाली टाकल्याचे पोलिसांना समजले. नंतर दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील आनंद बिहार, गांधी नगर, करावल नगर आणि परिसरात आरोपींच्या शोधात छापे टाकण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कपिल गुप्ता, सुनैना गुप्ता, राज किशोर आणि सचिन बापर्डा यांना अटक केल्याने या प्रकरणी खुनाचा उलगडा झाला आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.