Raja Raghuvanshi: तिला फासावर लटकवा, सख्ख्या भावानं सोनमशी तोडलं नातं; राजा रघुवंशीसाठी ढसाढसा रडला

Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या सोनम रघुवंशीबाबत तिचा भाऊ गोविंदने धक्कादायक विधान केले आहे. दोषी असेल तर सोनमला फासावर लटकवा, असे गोविंदने सांगितले.
Sonam Raghuvanshi: तिला फासावर लटकवा, सख्ख्या भावानं सोनमशी तोडलं नातं; राजा रघुवंशीसाठी ढसाढसा रडला
Sonam RaghuvanshiSaam
Published On

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय. राजा रघुवंशीची हत्या त्याची बायको सोनमने केली. सोनमने तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहसोबत मिळून राजाच्या हत्येचा प्लान करत ३ शूटर्सला हत्येची सुपारी दिली होती. पाचही आरोपी सध्या अटकेत आहेत. आता या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशीने आज इंदुरमध्ये जाऊन राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी तो राजाच्या आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला.

गोविंदने यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'जर सोनम दोषी असेल तर तिला फासावर लटकवा. आम्हाला सोनम आणि राजच्या नात्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आम्ही सोनमशी नातं तोडलं आहे. आम्ही राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांसोबत आहोत. राजाला न्याय मिळाला पाहिजे.'

राजाच्या आईची भेट घेतल्यानंतर गोविंदने सांगितले की, 'सोनमचं कुणासोबत प्रेमसंबंध नव्हते. जो कुणी दोषी असेल त्याला फाशी द्या. राज कुशवाह फक्त आमचा कर्मचारी आहे. सोनम आणि राजचे फक्त एक कर्मचारी म्हणून बोलणं व्हायचं. सोनम राज कुशवाहला राखी बांधायची.'

Sonam Raghuvanshi: तिला फासावर लटकवा, सख्ख्या भावानं सोनमशी तोडलं नातं; राजा रघुवंशीसाठी ढसाढसा रडला
Raja Raghuvanshi Case : हॉटेलमध्ये रुम नाही म्हणून सोनम आणि राजा सामान सोडून गेले अन्... २२ मेला चेरापुंजीत नेमकं काय घडलं?

गोविंदने पुढे असे देखील सांगितले की, 'गाजीपूरमध्ये मी फक्त २ मिनिटं सोनमला भेटलो. तेव्हा तिने गुन्हा कबुल केला नव्हता. सोनमने कधीच आपल्या आईला राज कुशवाहबद्दल सांगितले नाही. सोनमचं लग्न लवकर यासाठी झालं कारण पंडितने मुहूर्त काढला होता.'

तर दुसरीकडे, 'राजाचा भाऊ विपिन रघुवंशीने सांगितले की, गोविंद मंगळवारीच इंदुरला आला होता. त्याला हत्याकांडाची काहीच माहिती नव्हती. आम्ही गोविंदशी बोलत आहोत कारण तो त्याला या कटाविषयी काहीच माहिती नव्हती. गोविंद चांगला स्वभावाचा आहे. पण सोनमने सात कुटुंबं उद्ध्वस्त केली.

Sonam Raghuvanshi: तिला फासावर लटकवा, सख्ख्या भावानं सोनमशी तोडलं नातं; राजा रघुवंशीसाठी ढसाढसा रडला
Raja Raghuvanshi: राजा रघुवंशीला क्रूरपणे मारत होते; सोनम निर्दयीपणे बघत होती, भयानक हत्याकांडाला धक्कादायक वळण

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात मेघालय पोलिसांनी सोनम, राज कुशवाह आणि तीन कॉन्ट्रॅक्ट किलर आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. या प्रकरणात गोविंदच्या भूमिकेबद्दल कोणतेही पुरावे सापडले नाहीत. राजाचे कुटुंबीय आणि रघुवंशी समुदाय मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

Sonam Raghuvanshi: तिला फासावर लटकवा, सख्ख्या भावानं सोनमशी तोडलं नातं; राजा रघुवंशीसाठी ढसाढसा रडला
Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशीला मारल्याची सोनमची कबुली, बॉयफ्रेंडसोबतचा पहिला फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com