Raipur Accident: कार चालवताना रशियन तरुणी अचानक चालकाच्या मांडीवर बसली, स्टेअरिंगवरील ताबा सुटला अन्...

Raipur Accident: तीन तरुणांना घेऊन जाणाऱ्या स्कूटरला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने समोरासमोर धडक दिली. यात तीन जण गंभीर जखमी झालेत.
Car Accident
Raipur Accident
Published On

रायपूर येथील व्हीआयपी रोडवर कार आणि ट्रिपल सीट जाणाऱ्या एका स्कूटरचा अपघात झालाय. या अपघाताला कारणीभूत ठरलीय एक रशियन तरुणी. कारमध्ये असलेल्या एका रशियन तरुणीमुळे चार चाकी आणि स्कूटचा अपघात मोठा झालाय. याप्रकरणी पोलिसांन कार चालक आणि तरुणीला ताब्यात घेतलंय.

Car Accident
रिक्षा चालकाचा बेजबाबदारपणा, शाळकरी मुलांना बाईकने नेताना अपघात; कुर्ल्यात चिमुलकीचा सिमेंट मिक्सरखाली चिरडून अंत

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी कारमध्ये असलेली रशियन महिला ड्राव्हरच्या मांडीवर बसली होती. त्यामुले चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटलं आणि कार एका स्कूटरला धडकली. स्कूटवरून तीन जण प्रवास करत होते. या अपघातात तिघांना दुखापत झालीय.

अपघाताला कारणीभूत ठरलेली रशियन तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिलीय. तरुणीसोबत असलेल्या एकजण वकीलही दारूच्या नशेत होता. अपघाताच्या वेळी रशियन महिला ड्रायव्हरच्या मांडीवर बसली होती, त्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला. अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर गोंधळ उडाला.

Car Accident
Nashik Accident: पप्पा मोबाईलमध्ये व्यस्त; चिमुकला अचानक धावत सुटला, तेव्हाच नियतीनं डाव साधला अन् मुलगा बापासमोरच हिरावला!

अपघात झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी रशियन महिलेने पोलीस कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. भर रस्त्यावर धिंगाणा घातल्याने रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. त्यातील काहींनी या घटनेचा एक व्हिडिओ शूट करत सोशल मीडियावर व्हायरल केलाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांशी महिला वाद घालताना दिसत आहे. ड्रायव्हर आणि टुरिस्ट व्हिसावर असलेली रशियन महिला या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हा अपघात तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून आता या घटनेची कसून चौकशी सुरू आहे. कारवर "भारत सरकार" असा बोर्ड आहे, त्यामुळे कार आणि कार मालकाची चौकशी केली जात आहे. दरम्यान अपघातात जखमी झालेल्यांना मेकहरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिन्ही जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com