
अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिकमधील इंदिरानगर परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. हॉटेलच्या पार्किगमध्ये येणाऱ्या एका अलीशान कार खाली येऊन एका ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. ही घटना इंदिरानगरमध्ये घडलीय. ध्रुव राजपूत, असं अपघातात मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित चारचाकी वाहन चालकाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आपल्या वडिलांसोबत गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. खेळून येत असताना चिमुकला आपल्या वडिलांसोबत होता. मुलगा आणि त्यांचे वडील हॉटेलच्या पार्किंगमध्ये येताच नियतीने डाव टाकला आणि वडिलांच्या देखत मुलाचा मृत्यू झाला. गार्डनमधून खेळून आणल्यानंतर मुलाचे वडील मोबाईल पाहण्यात व्यस्त झाले. त्यानंतर वडिलांच्या पाठीमागून ध्रुव राजपूत पळत आला.
त्यावेळी त्याने बाजुने येणारी कार पाहिली नाही. सरळ पळू लागला, कार त्याच्या जवळ येताच तोच्या तोल गेला आणि तो खाली पडला. कार चालकालाही मुलगा खाली पडल्याचं दिसलं नाही. त्याने सरळ कार मुलाच्या अंगावरून पुढे नेली. कार मुलाच्या अंगावरून गेल्यानंतर कार चालकाला चोप दिला. दरम्यान हॉटेलमधील सिक्योरिटीने मुलाला रुग्णालयात नेलं.
दरम्यान अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ग्रे रंगाची कार हॉटेलमध्ये येत असताना ५ वर्षांचा ध्रुव राजपूत अचानक पळता पळता गाडी खाली आला. गाडीचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो जबर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.