Railway Ticket Booking : नो टेन्शन! सर्वांनाच मिळणार कन्फर्म तिकीट; रेल्वेचा मोठा प्लान

Railway Confirm Ticket : वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबरोबरच सर्वांना कन्फर्म तिकीट देण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन गांभीर्यानं विचार करत असून, रेल्वेने मोठी योजना आखली आहे.
Railway Confirm Ticket, Waiting List
Railway Confirm Ticket, Waiting ListSaam Tv
Published On

Latest News On Railway Ticket Booking :

लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबरोबरच सर्वांना कन्फर्म तिकीट देण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन गांभीर्यानं विचार करत असून, रेल्वेने मोठी योजना आखली आहे. पुढील चार ते पाच वर्षांत रेल्वेचे जाळे आणखी विस्तारले जाईल. त्यात जवळपास ३००० अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन वाढवण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीत वर्षभरात रेल्वेने ८०० कोटी प्रवासी प्रवास करतात. पुढच्या पाच वर्षांत प्रवाशांची संख्या एक हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं रेल्वेकडून विस्ताराची योजना आखल्याचे सांगण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरोना महामारीआधी १०१८६ मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत ही संख्या १०, ७४८ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने या योजनेची तयारी केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाची वेळ दोन ते पाच तासांनी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले?

पुढील चार-पाच वर्षांत ३००० नवीन ट्रेन सुरू करण्याची योजना आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा वेळही कमी करण्याचे लक्ष्य आहे. नवीन ट्रेन सुरू झाल्याने २०२७ पर्यंत वेटिंग तिकीटांची समस्या मार्गी लागणार आहे. सर्वांनाच कन्फर्म तिकीट मिळू शकेल, असं वैष्णव यांनी सांगितले.

Railway Confirm Ticket, Waiting List
Viral Dance video: मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर तरुणी अचानक नाचू लागली; डान्स पाहून काका दचकला, व्हिडिओ पाहून म्हणाल...

रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, ६९००० नवीन डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. दरवर्षी जवळपास ५००० डब्यांची निर्मिती केली जात आहे. दरवर्षी ४०० ते ४५० वंदे भारत ट्रेनसह २०० ते २५० नव्या ट्रेन धावू शकतील. प्रवासाचा वेळ कमी करण्याचे लक्ष्य असून, रेल्वेकडून नेटवर्क विस्तार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे.

Railway Confirm Ticket, Waiting List
Kartiki Ekadashi 2023: 'कार्तिकी' निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी लातूरसह मिरजहून रेल्वेच्या ३५ फेऱ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com