Ayodhya Special Train: अयोध्‍येला जाणाऱ्या आस्था स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जाहीर; कोणत्या शहरांमधून किती गाड्या?

Ayodhya Special Train News: अयोध्येला धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना आस्था स्पेशल ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. यातील बहुतांश ट्रेन्स अयोध्येला पोहोचल्यानंतर, एक दिवस थांबतील आणि दुसऱ्या दिवशी त्या माघारी निघतील
Ayodhya Special Train Latest News
Ayodhya Special Train Latest NewsSaam TV
Published On

Ayodhya Special Train Latest News

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलं आहे. त्यामुळे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्याला निघाले आहेत. मात्र, अयोध्याकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या फुल झाल्या आहेत. हीच बाब लक्षात घेता, रेल्वेने अयोध्येसाठी स्पेशल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ayodhya Special Train Latest News
Republic Day 2024: २६ जानेवारीला कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? संपूर्ण यादीच आली समोर...

अयोध्येला धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना आस्था स्पेशल ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. यातील बहुतांश ट्रेन्स अयोध्येला पोहोचल्यानंतर, एक दिवस थांबतील आणि दुसऱ्या दिवशी त्या माघारी निघतील, त्यामुळे प्रवाशांच्या परतीचा मार्ग देखील सुखकर होईल. (Latest Marathi News)

अयोध्येला जाण्यासाठी मुंबई-पुण्यातून किती ट्रेन?

येत्या ३० जानेवारीपासून पुणे येथून अयोध्यासाठी १५ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहे. दोन दिवसाला एक गाडी असं नियोजन असणार आहे. त्यामुळे अयोध्याला जाणाऱ्या रामभक्तांची अयोध्या वारी सोपी होणार आहे.

येत्या १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरुन अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असून कानपूर, प्रयागराजमार्गे ती अयोध्येला जाणार आहे. अयोध्येतून १६ रोजी परतीची रेल्वे आहे.

मुंबई येथून सुद्धा अयोध्येला जाता येईल. यासाठी अयोध्या साकेत एक्स्प्रेस एलटीटीवरून दर बुधवारी, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पोहचते. अयोध्येला पोहोचण्यासाठी सुमारे २६ तास लागतात. ही एक्स्प्रेस यादरम्यान २० थांब्यावर थांबा घेते.

अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन्स

अयोध्येला धावणारी आस्था स्पेशल ट्रेन माता वैष्णोदेवी कटरा येथून ३० जानेवारीला सुटेल. १ फेब्रुवारीला ती अयोध्येत पोहचले. त्यानंतर दोन फेब्रुवारीला ट्रेनचा परतीचा प्रवास असेल.

६ फेब्रुवारीला जम्मू येथून, ९ फेब्रुवारीला पठाणकोट, २९ जानेवारीला अंबानंद आणि ५ फेब्रुवारीला हिमाचल प्रदेशच्या उना येथून अयोध्येसाठी ट्रेन धावतील.

त्याचबरोबर १ फेब्रुवारीला डेहराडून, ८ फेब्रुवारीला योग नगरी, २९ जानेवारी, २ फेब्रुवारी आणि २४ फेब्रुवारीला नवी दिल्लीहून अयोध्यासाठी आस्था स्पेशल ट्रेन धावतील. ३१ जानेवारी, ४ फेब्रुवारी आणि २४ फेब्रुवारी रोजी आनंद विहार येथून अयोध्येला जाण्यासाठी ट्रेन असतील.

दिल्लीहून ३० जानेवारी, ३ फेब्रुवारी आणि ९ फेब्रुवारी आणि निजामुद्दीनहून १ आणि ५ फेब्रुवारीला अयोध्येसाठी ट्रेन धावतील. अंतरानुसार या गाड्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अयोध्या येथे पोहोचतील.

Ayodhya Special Train Latest News
Nagar-Kalyan Highway: नगर-कल्याण महामार्गावर ट्रॅक्टर-एसटी बसचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com