‘मोदी-शाह, अजित डोवाल हे खलनायक’; राहुल गांधींचा मोदी सरकारला थेट इशारा

Rahul Gandhi Slams Modi Government: दिल्लीत कॉक्रोच जनता पक्षाकडून आंदोलन केलं जातंय. दुसरीकडे दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जातेय. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारला इशारा दिलाय.
Rahul Gandhi Slams Modi Government
Rahul Gandhi Slams Modi Governmentsaam tv
Published On: 

दिल्ली आणि मुंबईमध्ये कॉक्रोच जनता पक्षाकडून आंदोलन केलं जातंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी देशभरात आंदोलन केलं जातंय. मात्र हे आंदोलन दडपून काढण्यासाठी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरूय. सीजेपी अभिजीत दीपके, सौरभ दास, अशुतोष रांका यांना अटक करण्यात आलीय. दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उभारण्यात आलाय. त्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. एका सोशल मीडियाच्या पोस्टमधून त्यांनी मोदी सरकारला थेट आव्हान दिलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल हे देशाचे खलनायक असल्याचा आरोप राहुल गांधींनी या व्हिडिओतून केलाय. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ लढा देत असल्याचा दावा करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्याभोवतीचा फास हळूहळू आवळला जात असल्याचं ते म्हणालेत. कितीही पोलीस फौज तैनात केली किंवा नेत्यांना आणि तरुणांना अटक केली, तरी माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

आपल्या पोस्टमधून राहुल गांधी म्हणाले की, मागील दहा वर्षांहून अधिक काळ नरेंद्र मोदी आणि आरएसएसची लढा देत आहोत. तुम्ही जसं तुमच्या प्रतिस्पर्ध्याला पुरेपूर ओळखता तसं मी त्यांना चांगलंच ओळखून आहे. भ्याडपणा हा या लोकांचा मूळ स्वभाव आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, ज्ञानेश कुमार आणि अजित डोवाल हे यामधील खलनायक आहेत. त्यांच्याभोवतीचा फास आता हळूहळू आवळला जात आहे. आम्ही तो फास घट्ट आवळत आहोत.

मोदी, तुम्हाला जे हवं ते करा. तु्म्ही पोलिसांची फौज बोलवा. १० हजार, २० हजार, ५० हजार, जितके बोलवायचे तितके बोलवा. आमच्या सगळ्या नेत्यांना अटक करा. तरुणांना अटक करा, आम्हाला सगळ्यांना अटक करा.

आता आम्ही तुम्हाला सर्व बाजूने वेढा घातला आहे. आता अजिबात माघार घेणार नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमचे संविधान, या देशातील जनतेचा आवाज सुरक्षित ठेवू. मागील १० ते १५ वर्षांहून अधिक वर्षे या देशात जे काही घडलं, जे झालं, ते पुन्हा होणार नाही, असा शब्द आम्ही देतो. या देशातील तरुणाईचा मला अभिमान वाटतो. तुम्ही आंदोलने सुरूच ठेवा. आम्ही ठामपणे तुमच्या पाठिशी आहोत. या हुकूमशाही राजवटीचा आणि आपल्या संविधानावर घाला घालणाऱ्यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा शब्द आम्ही देतो.

राहुल गांधींवर भाजपचा पलटवार

राहुल गांधींच्या आव्हानानंतर भाजपनेही पलटवार केला आहे. राहुल गांधींनी उद्धटपणा थांबवावा. देशाची जी प्रगती झाली आहे, ती खुपतेय. कटकारस्थानांसमोर देश कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही, असं भाजपनं म्हटलं आहे. राहुल हे भारताच्या विरोधात चुकीचे नॅरेटिव्ह तयार करत आहेत. संवैधानिक संस्थांचा ते सन्मान करत नाहीत. पराभवाने हताश झालेले लोक दिल्लीच्या जनतेला त्रास देत आहेत. काँग्रेसने तर कित्येक निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केले आहे. हा देश संसदेतून चालणार आहे, रस्त्यावर नाही. राहुल यांनी पराभवानंतर आंदोलनाला शस्त्र बनवले. राष्ट्रपतींच्या भेटीवर खोटे बोलले. त्यांनी आणीबाणीवर भाषण देऊ नये. काँग्रेसनेच आणीबाणी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com