पंतप्रधान माझे फोन टॅप करत आहेत, राहुल गांधींचा खळबळजनक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Phone Tapping Allegation : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपला फोन टॅप केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी हा दावा केला.
Rahul Gandhi
Rahul Gandhi on Modi remarksSaam TV marathi
Published On: 

Rahul Gandhi phone tapping allegation against Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या आरोपांमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मात्र, फोन टॅपिंगच्या आरोपाला स्वतंत्र अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. राहुल गांधी यांच्या आरोपावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नाना पटोले यांनी यावरून भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपला फोन टॅप केला जात असल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींकडून फोन टॅपिंग केले जात असल्याचे पुरावेही असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला.

परकीय शक्तींच्या सांगण्यावरून कोण काम करत आहे. कोण देशद्रोही आहे आणि ते किती काळापासून देशद्रोही कारवायांमध्ये सामील आहेत. याबाबत मला माहिती आहे, त्याची माहिती माझ्या फोनमध्ये असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi
रोहित, विराट अन् श्रेयस आले अन् भोपळाही न फोडता गेले, पहिल्याच षटकात भारताचे ३ फलंदाज बाद

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर जाहीर चर्चेचे आव्हान दिले. दोघांमध्ये समोरासमोर चर्चा झाली, तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी' सत्रादरम्यान राहुल गांधींना अनेक प्रश्न विचारण्यात आले. भाजप संसदेत चर्चेसाठी तयार असताना ते सार्वजनिक चर्चेचा आग्रह का धरत आहेत, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांना लोकसभेत बोलण्याची परवानगी नव्हती आणि त्यांचा मायक्रोफोन बंद करण्यात आला होता.

Rahul Gandhi
Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्याचे भाव धडाधड कोसळले! प्रतितोळा १३१० रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर

राहुल गांधी म्हणाले की, कृषी कायदे, मतचोरी, एसआयआर, चीन, जनरल नरवणे यांचे पुस्तक आणि एपस्टाईन यांसारख्या विषयांवर बोलण्याची परवानगी नव्हती. भाजपला लांबलचक भाषणांची चर्चा नको असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.