Breaking News : राहुल गांधींना झारखंड हायकोर्टाचा मोठा झटका; कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार

Rahul Gandhi News Update : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे.
Rahul Gandhi News Update
Rahul Gandhi News UpdateSAAM TV
Published On

Rahul Gandhi Latest News :

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दणका दिला आहे. सन २०१८ मध्ये अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याच्या प्रकरणात निर्णय देताना कोर्टानं गांधी यांची याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात राहुल यांच्याविरुद्ध खटला चालवला जाणार आहे. (Latest Marathi News)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एमपीएमएलए कोर्टाने बजावलेल्या समन्सला आव्हान देत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. मागील सुनावणीत कोर्टाने या प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला होता.

अमित शहांबद्दल वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांनी सन २०१८ मध्ये बेंगळुरूत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी ट्रायल कोर्टात सुरू असलेली कार्यवाही रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. १६ फेब्रुवारी रोजी राहुल यांनी बाजू मांडली होती. त्या सुनावणीत कोर्टाने यावरील निर्णय राखून ठेवला होता.

Rahul Gandhi News Update
Mallikarjun Kharge Security: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना झेड प्लस सुरक्षा, 58 कमांडोच्या 24 तास राहणार सोबत

यापूर्वी मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सूरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे राहुल यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली होती.

Rahul Gandhi News Update
Maharashtra Politics: राष्ट्रवादीला ४-५ जागाच मिळतील; महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? विजय वडेट्टीवार यांनी सविस्तर सांगितलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com