Gas Leack In Punjab: किराणा दुकानातून निघाला जीवघेणा वायू; मृतदेह पडले निळे, लुधियानातील ११ जणांच्या मृत्यूची थरारक कहाणी

Punjab Latest News: पंजाबच्या लुधियानात विषारी वायूमुळे ११ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे.
Punjab Gas Leak
Punjab Gas LeakSaam Tv
Published On

Punjab News: पंजाबच्या लुधियानात दुर्दैवी घटना घडली आहे. पंजाबच्या लुधियानात विषारी वायूमुळे ११ जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली. विषारी वायूमुळे लुधियानात ११ जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पंजाबमधील लुधियानात झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी अरविंद चौबे यांनी सांगितले की, 'सकाळी गटारातून धूर बाहेर येत होता. पावसामुळं गटार तुंबलं होतं. त्यामुळे कदाचित गटारातून विषारी वायू येत होता. लोकांचे विषारी वायूमुळे पडतानाचे व्हिडिओ देखील काढले. या मृत लोकांचे मृतदेह निळे पडल्याचंही समोर आलं आहे.

Punjab Gas Leak
Stray Dog Attack : शेतात चालले असं सांगून निघाली ती घरी परतलीच नाही; वाटेतच घडली भयंकर घटना

या प्रकरणात पोलीस-प्रशासनाने विषारी वायूबद्द्ल कसलाही निष्कर्ष काढलेला नाही. लुधियानाच्या उपायुक्त सुरभि मलिक यांनी सांगितले की, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पण आताच या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही की, विषारी वायू कोणता होता, अद्याप कळू शकलेले नाही. विषारी वायू अद्याप काही भागात पसरलेला आहे. विषारी वायूमुळे अनेक जणांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले'.

लुधियानाचे पोलीस कमिश्नर मनदीप सिंह सिद्धू यांनी सांगितले की, या मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा सामावेश आहे. चार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांच्या रक्ताची तपासणी सुरु करण्यात आली आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, विषारी वायूचा परिणाम थेट लोकांच्या आतड्यावर नाही तर डोक्यावर झाला'.

Punjab Gas Leak
Viral Snakes Video : बापरे बाप! महिलेच्या बॅगेतून निघाले तब्बल २२ साप; घटनेचा VIDEO व्हायरल

नेमकं काय घडलं?

या इमारतीत दुधाचं केंद्र होतं. सकाळी दूध घेण्यासाठी गेलेले नागरिक बेशुद्ध झाले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झालेल्या इमारतीच्या 300 मीटरच्या आतील उभे लोक बेशुद्ध झाले. दरम्यान कोणत्या गॅसची गळती झाली आणि त्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com