Lucky Oberoi Death : आपच्या बड्या नेत्याची हत्या, गुरूद्वारासमोर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात खळबळ

Punjab AAP Leader Lucky Oberoi Death News : पंजाबमधील जालंधर येथे गुरुद्वाराबाहेर आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
Lucky Oberoi Death : आपच्या बड्या नेत्याची हत्या, गुरूद्वारासमोर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात खळबळ
Punjab AAP Leader Lucky Oberoi Death NewsSaam Tv
Published On
Summary
  • जालंधरमध्ये ‘आप’ नेते लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या हत्या

  • दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांचा गोळीबार

  • आरोपी घटनास्थळावरून फरार

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू, राजकारणात खळबळ

Punjab AAP Leader Lucky Oberoi Shot Death News पंजाबमध्ये राजकारणात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. जालंधरमधील गुरुद्वाराबाहेर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ओबेरॉय हे गुरुद्वाराबाहेर त्यांची कार पार्क करत असताना काही हल्लेखोर दुचाकीवरून तिथे आले. ओबेरॉय हे कारमध्ये असतानाच हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या गोळीबारात ओबेरॉय गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.

Lucky Oberoi Death : आपच्या बड्या नेत्याची हत्या, गुरूद्वारासमोर धाडधाड गोळ्या झाडल्या; राजकारणात खळबळ
Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. दिवसाढवळ्या एखाद्या नेत्याची हत्या होणं ही गंभीर बाब असून जर नेतेचं सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेने राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com