पंजाबमधील आम आदमी पक्षातून बाहेर पडलेल्या तीनपैकी दोन नगरसेवक शनिवारी घरवापसी केली आहे. पूनम देवी आणि नेहा मूसावत, अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. गुरचरण काला यांच्यासह या दोन नगरसेविकांनी 18 फेब्रुवारी रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते आणि पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही देण्यात आल्या होत्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दोन नगरसेवकांच्या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. आपचे तीन नगरसेवक एकत्र आल्याने बहुमतात आलेला भाजप आता चंदीगड महापालिकेत अल्पमतात आला आहे. तीन नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे महापालिकेत काँग्रेस आणि आप कमकुवत झाली होती. काँग्रेस आणि आपची संख्या 20 वरून 17 वर आली आहे. (Latest Marathi News)
निवडणुकीच्या वेळी भाजपचा महापौर विजयी झाल्याचे घोषित करण्यात आली. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना मोठा धक्का देत हा निर्णय पालटला होता. यानंतर पहिल्यांदा इंडिया आघाडीचा महापौर झाला. मात्र आपचे नगरसेवक सोबत आल्याने त्यावेळी भाजपला उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवता आला.
दरम्यान, 30 जानेवारीला चंदीगडमध्ये महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत हेराफेरीचा आरोप करत काँग्रेस आणि आपने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली होती आणि मतपत्रिका सील केल्याचा आरोपही केला होता. हा लोकशाहीचा खून आहे, असे म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महापौर निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी अनिल मासिल यांना फटकारले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.