आपला बॉस किंवा मालक मोठ्या मनाचा असावा. आर्थिक गोष्टींमध्ये त्याने आपल्याला लागणारी प्रत्येक मदत करावी. तसेच बक्षीस म्हणून महागडे गिफ्ट किंवा रक्कम द्यावी असं अनेकांना वाटतं. अशात जीरकपुर येथे गुरदीप सिंह बाथ यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीला थेट १ कोटींचं घड्याळ गिफ्ट म्हणून दिलं आहे.
आपल्या कामात आपण चोख असलो की त्याचं योग्य फळ आपल्याला नक्की मिळतं असं म्हणतात. तसंच काहीसं पंजाबच्या या काँट्रॅक्टरसोबत घडल्याचं दिसत आहे. गुरदीप सिंह बाथ यांची फार मोठी जमीन आहे. त्यात त्यांनी मोठी हवेली म्हणजेच वाडा बांधण्याचं काम काढलं होतं. ही हवेली बनवून झाल्यावर कारागार आणि काँट्रॅक्टरचं काम त्यांना फार जास्त आवडलं. ते इतके आनंदी झाले की त्यांनी १ कोटी रुपयांचं रॉलेक्सचं घड्याळ काँट्रॅक्टरला दिलं.
एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार गुरदीप देव बाथ पंजाबमधील जीरकपुरमध्ये ९ एकर जागेत हवेली बांधण्यात आली आहे. ही हवेली म्हणजेच महाल बांधण्याची जबाबदारी रजिंदर सिंह रोपडा यांच्यावर होती. त्यांनी पारंपारीक राजस्थानी शैलीने याचे काम पूर्ण केले.
एखादा लहान आकाराचा किल्ला असेल इतकी मोठी ही हवेली आहे. एवढी मोठी हवेली बनवणे साधे काम नाही. त्यासाठी मोठी मेहनत लागते. मात्र काँट्रॅक्टरने फक्त २ वर्षांच्या आतमध्ये याची उभारणी केली. यातील प्रत्येक काम अगदी चोख आणि परफेक्ट करण्यात आलं आहे.
जीरकपुरमधील गुरदीप सिंह यांची भली मोठी हवेली बांधण्यासाठी तेवढीच मेहनत देखील लागली. अवघ्या दोन वर्षांत हवेली पूर्ण झाली कारण २०० हून जास्त कामगार येथे काम करत होते. दिवस आणि रात्री कामगारांचे काम सुरू होते.
हवेलीचे आर्किटेक्ट रणजोध सिंह आहेत. त्यांनी विविध सुविधा सहज मिळतील याची काळजी घेतली आहे. गुरदीप देव बाथ यांनी हे काम पाहिल्यावर त्यांना फार आनंद झाला. त्यांना वास्तू पाहून अगदी स्वप्नात पाहिलेलं घर आठवलं आणि ते इतके आनंदी झाले की त्यांनी थेट १ कोटींचं घड्याळ गिफ्ट केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.