Cyber Police : सावधान! तुमचं फेसबुक अकाऊंट हॅक होऊ शकतं, फेसबुक वापरताना 'ही' काळजी घ्याल

सोशल मीडियाचा केंद्रबिंदू असलेल्या आणि जगभरात लोकप्रिय झालेल्या फेसबुकबाबत मोठी अपडेट आली आहे.
Facebook
FacebookSaam Tv
Published On

सचिन जाधव

पुणे : सोशल मीडियाचा केंद्रबिंदू असलेल्या आणि जगभरात लोकप्रिय झालेल्या फेसबुकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तुम्ही फेसबुकचे वापरकर्ते असाल तर तुम्हाला आता सावध राहावं लागणार आहे. पुण्यात बोगस फेसबुक खात्यांचा (Facebook Account) गैरवापार करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मागील सात महिन्यात सातशेहून अधिक फसवणुकीच्या घटना घडल्या असून याप्रकरणी (Pune Cyber Police) पुणे शहर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Facebook
पालघरच्या 'या' भागात विकासकामांना खीळ, ग्रामस्थांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पैशाची गरज आहे, असं सांगून फेसबुकवरून अनेक युजर्सकडे पैशांची मागणी करण्यात येत आहे. सायबर हल्लेखोरांनी बोगस फेसबुक खाते तयार करून ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार सुरु केला आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. दिवसेंदिवस मोबाईलवर फेसबुकचा वापर वाढत आहे. फेसबुक आपली सर्व वैयक्तिक माहिती देत असतो.याचाच फायदा हॅकर्स घेतात.बनावट फेसबुक अकाउंट ओपन करून नागरिकांची फसवणूक केली जाते.याबाबत सायबर पोलीस फेसबुक वापरताना काळजी घेण्याचं आवाहन करत असतात, अशी माहिती सायबर पोलीसचे पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी दिली आहे.

फेसबुक वापरताना 'ही' काळजी घ्या

  • ईमेल,फेसबुक पासवर्ड कायम बदलत राहा.

  • अक्षरे, अंक चिन्हाचा वापर करून पासवर्ड मजबूत करा.

  • वैयक्तिक माहिती समाज माध्यमाद्वारे सार्वजनिक करू नका.

  • अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नका.

  • मोबाईल, टॅब, लॅपटॉप कॉम्प्युटर अशा डिवाईसमध्ये अँटीव्हायरस अपलोड करा.

Facebook
Mrunal Thakur : मराठमोळ्या मृणाल ठाकूरने दुबईच्या आयलॅंडवर केली धमाल, फोटो झाले व्हायरल

फेसबुक अकाऊंट हॅक झाल्यास काय कराल ?

  • फेसबुकच्या ग्रीव्हनसवर जाऊन तात्काळ नोंद करा

  • सायबर पोलिसांकडे तात्काळ तक्रार नोंदवा.

  • तक्रार नोंदणी क्रमांक पोलिसांना कळवा.

  • हॅक झालेले खाते बंद करण्यासाठी पोलिसांशी संपर्क करा.

  • आर्थिक फसवणूक झाल्यास बँकेला तात्काळ माहिती द्या.

    Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com