PM Modi Bhutan Visit: पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय भूतान दौरा रद्द, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले कारण

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसीय भूतान दौरा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा राज्य दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
PM Modi Bhutan Visit
PM Modi Bhutan VisitSAAM TV
Published On

PM Modi Bhutan Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसीय भूतान दौरा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, खराब हवामानामुळे पंतप्रधानांचा राज्य दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. दोन्ही देशांदरम्यान पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्यासाठी नवीन तारखेचा विचार केला जात आहे. पंतप्रधान मोदी २१ ते २२ मार्च रोजी भूतानच्या दौऱ्यावर जाणार होते.

पंतप्रधान मोदींच्या या नियोजित दौऱ्याबद्दल एक निवेदन प्रसिद्ध करत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "पारो विमानतळावरील खराब हवामानामुळे, २१-२२ मार्च २०२४ रोजी पंतप्रधानांचा भूतानचा राज्य दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे." (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi Bhutan Visit
Bihar Lok Sabha: बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसमध्ये कधी होणार जागावाटप? मनोज झा यांनी दिली महत्वाची माहिती

परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सद्भावना यावर आधारित अद्वितीय आणि चिरस्थायी अशी भागीदारी भारत आणि भूतान यांच्यात आहे. पंतप्रधान मोदी आपल्या या दौऱ्यात भूतानचे राजे महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे महामहीम जिग्मे सिंग्ये वांगचुक यांची भेट घेणार होते. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांच्याशी पंतप्रधान मोदी चर्चाही करणार होते. (Latest Marathi News)

दरम्यान, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे हे गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते. जानेवारीमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. विविध उद्योगांच्या प्रमुखांच्या बैठका घेण्याबरोबरच त्यांनी इतरही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

PM Modi Bhutan Visit
UP Lok Sabha: सपाने आणखी एक यादी केली जाहीर, नोएडामधून बदलला उमेदवार; कारण काय?

यानंतर पंतप्रधान मोदी यांचा या दौरा नियोजित करण्यात आला होता. जो आता खराब वातावरणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आता दोन्ही देशातील अधिकारी नवीन तारखांवर विचार करत आहेत. ही तारीख ठरल्यानंतर माध्यमात ती जाहीर केली जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com