Bihar Lok Sabha: बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसमध्ये कधी होणार जागावाटप? मनोज झा यांनी दिली महत्वाची माहिती

Lok Sabha Election 2024: बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील पक्ष काँग्रेस आणि आरजेडी लवकरच जागावाटपाची घोषणा करू शकतात.
Tejashwi Yadav and Rahul Gandhi
Tejashwi Yadav and Rahul GandhiSaam Tv
Published On

Lok Sabha Election 2024:

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील पक्ष काँग्रेस आणि आरजेडी लवकरच जागावाटपाची घोषणा करू शकतात. यासाठी दोन्ही पाकसाची दिल्लीत चर्चाही झाली. मात्र बैठकीतही त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. बैठकीनंतर आरजेडीचे मुख्य प्रवक्ते मनोज झा म्हणाले की, बिहारमधील जागावाटप एक-दोन दिवसांत निश्चित होईल.

आरजेडीचे खासदार आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते मनोज झा म्हणाले की, चर्चा सकारात्मक दिशेने जात आहे. बुधवारी नवी दिल्लीत काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या घरी आरजेडी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर चर्चा झाली. झा म्हणाले की, जागावाटपावर एकमत झाले आहे. एक-दोन दिवसांत सर्वकाही स्पष्ट होईल.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tejashwi Yadav and Rahul Gandhi
UP Lok Sabha: सपाने आणखी एक यादी केली जाहीर, नोएडामधून बदलला उमेदवार; कारण काय?

इंडिया आघाडीच्या घटक पक्षांकडून किती जागा लढवल्या जातील याविषयी विचारले असता झा म्हणाले, तुम्ही संख्याबळावर बोलत आहात, आम्ही जिंकण्याच्या दृष्टीने विचार करत आहोत. एक चांगला फॉर्म्युला निघेल आणि सर्व काही ठरवले जाईल. (Latest Marathi News)

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (RLJPA) नेते पशुपती कुमार पारस यांच्याबद्दल विचारले असता झा म्हणाले की, युतीच्या साथीदारांचा वापर करून त्यांना फेकण्याची भाजपची परंपरा आहे. ते म्हणाले की, पारस यांच्यासोबत जे घडले ते काही नवीन नाही. भाजप हेच करतो. त्यांनी याआधी चिराग पासवान यांना दूर केलं आणि पारस यांना सोबत ठेवले. आता त्यांनी पारस यांना दूर केलं आणि चिराग यांना सोबत ठेवलं. वापरा आणि फेकण्याचे धोरण भारतीय राजकारणात या प्रमाणात कधीच पाहिले गेले नाही.

Tejashwi Yadav and Rahul Gandhi
Asaduddin Owaisi: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी MIM किती उमेदवार उभे करणार? असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं उत्तर

कोणाचेही नाव न घेता मनोज झा खासदार म्हणाले की, आगामी काळात आणखी अनेक लोकांचा वापर केला जाईल आणि फेकलं जाईल. बिहारचा महत्त्वाचा चेहरा त्यापैकी एक असू शकतो. ते कोणाकडे इशारा करत आहेत, असे विचारले असता झा म्हणाले, माझे संकेत स्पष्ट आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com