UP Lok Sabha: सपाने आणखी एक यादी केली जाहीर, नोएडामधून बदलला उमेदवार; कारण काय?

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये पीलीभीत-घोशीसह 6 जागांवर पक्षाने उमेदवार घोषित केले आहेत.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSaam Tv
Published On

Uttar Pradesh Lok Sabha Election:

लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. यामध्ये पीलीभीत-घोशीसह 6 जागांवर पक्षाने उमेदवार घोषित केले आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाने राजस्थानमध्ये तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

सपाच्या सहाव्या यादीतील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अखिलेश यादव यांनी नोएडामधून आपला उमेदवार बदलला आहे. येथून डॉ.महेंद्र नगर यांना पक्षाने तिकीट दिले होते. मात्र त्यांच्या नावाची घोषणा होताच पक्षात गटबाजी सुरू झाली. याला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही विरोध केला होता. यावर सपाने गौतम बुद्ध नगरमधून उमेदवार बदलून राहुल अवाना यांना उमेदवारी दिली.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Akhilesh Yadav
Asaduddin Owaisi: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी MIM किती उमेदवार उभे करणार? असदुद्दीन ओवैसी यांनी दिलं उत्तर

समाजवादी पक्षाने बुधवारी उत्तर प्रदेशसाठी सहावी यादी जाहीर केली. या यादीत संभलमधून झियाउर रहमान बरफ, बागपतमधून मनोज चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर घोसीमधून राजीव राय आणि मिर्झापूरमधून राजेंद्र एस बिंद निवडणूक लढवणार आहेत. भागवत सरन गंगवार यांना पिलीभीतमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर सपाने गौतम बुद्ध नगरमधून राहुल अवाना यांना उमेदवारी दिली आहे.  (Latest Marathi News)

Akhilesh Yadav
Buldhana Lok Sabha: '...फक्त थोडे दिवस थांबा', शिंदे - फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचा इशारा

बसपाने या जागांवरून उमेदवार केले जाहीर

दरम्यान, भरतपूर, सिरोही आणि कोटा येथून बहुजन समाज पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. यासह बसपने आतापर्यंत पाच जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सिरोहीमधून लालसिंह राठोड, भरतपूरमधून अंजला आणि कोटामधून भीम सिंह कुंतल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com