Kolkata Case : मी प्रचंड घाबरलेय..., कोलकाताच्या घटनेवर २० दिवसांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया

Draupadi Murmu On Kolkata Case: कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत आहेत. महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या घटनांबाबत राष्ट्रपतींनी दु:ख व्यक्त केले आहे.
Kolkata Case: मी प्रचंड घाबरलेय..., कोलकाताच्या घटनेवर २० दिवसांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया
Draupadi Murmu Saam Tv
Published On

कोलकाता येथील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २० दिवसांनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'कोणत्याही सुसंस्कृत समाजात बहिणी आणि मुलींवर असा अत्याचार होऊ दिला जाऊ शकत नाही. या घटनेमुळे मी निराश आणि मी प्रचंड घाबरली आहे.', असे त्यांनी सांगितले.

तसंच, कोलकातामध्ये विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक आंदोलन करत आहेत. महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचाराच्या घटनांबाबत दु:ख व्यक्त करताना राष्ट्रपतींनी सांगितले की, 'प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. निर्भया सामूहिक बलात्काराच्या घटनेला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. बलात्काराच्या असंख्य घटना समाज विसरला आहे. समाज म्हणून आपला हा सामूहिक विस्मरण चिंतेचा विषय आहे.'

Kolkata Case: मी प्रचंड घाबरलेय..., कोलकाताच्या घटनेवर २० दिवसांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया
Kolkata Murder Case : काम सोडून आम्ही पण कोर्टाबाहेर बसू का? CJI चंद्रचूड यांची कठोर टिप्पणी

राष्ट्रपतींनी पुढे सांगितले की, 'महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांना आपण सर्वांनी मिळून सामोरे जावे लागेल. कोणताही पक्षपात न करता आपण आत्मपरीक्षण करणे आणि चर्चा करणे महत्त्वाचे आहे. काही कठीण प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. अनेकदा 'विकृत मानसिकता' महिलांना कुमकुवत माणूस, कमी ताकदवान, कमी सक्षम, कमी हुशार म्हणून पाहते. डॉक्टर, विद्यार्थी आणि नागरिक आंदोलन करत असतानाही गुन्हेगार अशाप्रकारच्या घटना करण्याचा प्रयत्नात आहेत.'

राष्ट्रपतींनी असे देखील सांगितले की, 'महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे गांभीर्याने घेतली पाहिजेत. अशा घटना घडल्यानंतर घटना विसरत राहणे योग्य होणार नाही. निर्भया प्रकरणानंतर १२ वर्षांत झालेल्या बलात्काराच्या असंख्य घटना समाज विसरला आहे. हा 'कलेक्टिव्ह ॲम्नेशिया' चांगला नाही.' तसंच, 'जे समाज इतिहासाला सामोरे जाण्यास घाबरतात ते सामूहिक स्मृतिभ्रंशाचा अवलंब करतात. आता भारताला इतिहासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.', असे देखील त्यांनी सांगतिले. दरम्यान, कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेयेविरोधात देशभरात लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. मंगळवारी कोलकात्यात आंदोलन करण्यात आले. भाजपने आज पश्चिम बंगाल बंदची हाक दिली आहे.

Kolkata Case: मी प्रचंड घाबरलेय..., कोलकाताच्या घटनेवर २० दिवसांनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची प्रतिक्रिया
Kolkata Doctor Death: कोलकाता अत्याचार प्रकरण! सुप्रीम कोर्टात ममता सरकारची खरडपट्टी, कारवाईवरुन प्रश्नांची सरबत्ती; डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com