UP Encounter: उमेश पाल हत्याकांड प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पहिली गोळी झाडणारा उस्मान पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार

Umesh Pal Case: शूटर उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
UP News
UP News Saam TV

UP Encounter : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या उमेश पालच्या यांच्या हत्याकांड प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उमेश पाल हत्याकांडात सहभागी असलेला शूटरला पोलिसांनी चकमकीत ठार केलं आहे. विजय उर्फ ​​उस्मान असे शूटरचे नाव आहे.

प्रयागराजच्या कौंधियारा भागात ही चकमक झाली. शूटर उस्मानवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. उस्मानने उमेश यांच्यावर पहिली गोळी झाडल्याचे बोलले जात आहे. (Latest News)

UP News
छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीतून उभारलेला औरंगजेब चौक पोलिसांनी हटवला, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

उमेश पाल बसपा आमदार राजू पाल यांच्या खून प्रकरणातील साक्षीदार होते. गेल्या शुक्रवारी 24 फेब्रुवारीला न्यायालयातून घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

UP News
Pune News: पैसे थकल्याने PMPML ठेकेदार अचानक संपावर, पुणेकरांचे हाल होणार

हल्लेखोरांनी अनेक गोळ्या उमेश पाल यांच्यावर झाडल्या. तसेच हल्लेखोरांनी बॉम्ब हल्लाही केला होता. ज्यात उमेश पाल आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला पोलीस कर्मचारी संदीप निषाद यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक पोलीस कर्मचारी राघवेंद्र गंभीर जखमी झाले होते, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com