छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीतून उभारलेला औरंगजेब चौक पोलिसांनी हटवला, अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

नव्या चौकाचा हा प्रकार समोर येताच मनसेने हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला.
Aurangjeb chauk
Aurangjeb chaukSaam TV

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच चिकलठाणा येथील विमानतळ समोरील दुभाजकावर अज्ञात व्यक्तींनी आलमगीर औरंगजेब चौक नावाने चौक उभारला.

नव्या चौकाचा हा प्रकार समोर येताच मनसेने हा सर्व प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर पोलिसांनी तात्काळ याठिकाणी कलर‌ मारुन चौक हटवला आहे. याप्रकरणी शहरातील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात एकाविरुद्व कलम 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest News Update)

Aurangjeb chauk
Maharashtra Politics : फडणवीसांची अवस्था डोळे बंद करून दूध पिणाऱ्या मांजरासारखी, नाना पटोले यांचा खोचक टोला

एकंदरीतच नामांतराविरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणात औरंगजेबाचा फोटो दिसल्यानंतर आता त्याच्या नावाने चौक निर्माण केल्याने आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com