Pune News: पैसे थकल्याने PMPML ठेकेदार अचानक संपावर, पुणेकरांचे हाल होणार

PMPML Contactor Strike: तीन महिन्यांची बिले थकल्याने या ठेकेदारांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.
PMPML
PMPMLSaam TV

पुणे : पुणेकरांना PMPML ठेकेदारांच्या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएल ठेकेदार दुसऱ्या दिवशीही संपावर ठाम आहेत. ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी संप पुकारला आहे. ३ महिन्यांची बिले थकल्याने या ठेकेदारांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. (Pune news)

ठेकेदारांच्याा संपात फटका पुणेकरांना बसणार आहे. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक यामुळे कोलमडण्याची शक्यता आहे. जवळपास 1100 बसेस यामुळे धावणार नसल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे.

PMPML
बड्डे आहे लेकाचा... मुलाच्या वाढदिवशी चक्क 'कार' कापली! वसईतील सोहळ्याची राज्यभर चर्चा

पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी ठेकेदारांना संप मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र ठेकेदार आपल्या संपाच्या निर्णयावर ठाम आहेत. ठेकेदारांनी अनेक वेळा पत्र व्यवहार करून देखील त्यांना वेळेवर थकबाकी मिळालेली नाही. (Latest News)

PMPML
Chandrashekhar Bawankule: 'शिमग्याच्या बोंबा पुरे...' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' टीकेनंतर बावनकुळेंचा हल्लाबोल; 'तुम्ही CM असताना...'

काल म्हणजेच रविवारी संध्याकाळी अचानक ठेकेदारांनी संपाचा निर्णय घेतल्यानंतर रस्त्यावर पीएमपीएमएल बस संख्या अचानक कमी झाली.पीएमपीएमएलकडे सध्या २१४२ बसेस आहेत. यापैकी ११०० बसेस या ठेकेदारांच्या असून इतर ९०० बसेस या पीएमपीच्या मालकीच्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com