Maha kumbh 2025: महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! तुमचे फोटो होतायेत व्हायरल, व्हिडिओंचा होतोय गैरवापर

Women Privacy Concerns at Mahakumbh: महिलांनो नदीत स्नान करण्यापूर्वी सावध व्हा. कारण, कॅमेऱ्यांचा तुमच्यावर डोळा आहे. काही लोक तुमचे अंघोळ करतानाचे फोटो काढून सोशल मीडियामध्ये शेअर करत आहेत.
Maha Kumbh
Maha KumbhSaam Tv News
Published On

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ २०२५ मध्ये आतापर्यंत कोटींच्या घरात लोकांनी स्नान केलं असेल. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ९३ लाखांहून अधिक भाविकांनी संगमात धार्मिक स्नान केले आहे. पुरुष आणि महिलावर्ग मोठ्या संख्येनं येतात आणि स्नान करतात.

पण महिलांनो नदीत अंघोळ करण्यापूर्वी सावध व्हा. कारण, काही कॅमेऱ्यांचा तुमच्यावर डोळा आहे. काही लोक तुमचे स्नान करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढून सोशल मिडियामध्ये शेअर करत आहेत. ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

महिलांच्या फोटो आणि व्हिडिओंचा गैरवापर

संगमात पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुली आणि महिला जातात. मात्र, काही लोक महाकुंभात स्नान करण्यासाठी आलेल्या महिलांचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. याशिवाय, काही महिलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडिया विकत आहेत. नदीत अंघोळ करण्यापासून ते बदलण्यापर्यंतचे फोटो टेलिग्रामवर विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Maha Kumbh
Crime News: विद्यार्थ्यांची कार रेसिंग अन् जीवघेणा स्टंट; पोलिसांनी दाखवला इंगा, केली दंडात्मक कारवाई

या प्रकरणी यूपी पोलिसांनी काय म्हटले?

काही जण हे फोटो आणि व्हिडिओ जुने असल्याचा दावा करत आहेत. तर काहींनी हे फोटो आणि व्हिडिओ प्रयागराजमधील नसल्याचा दावा केला आहे. पण हे फोटो महाकुंभातील असल्याचं सांगून व्हायरल करण्यात येत आहे.

Maha Kumbh
Crime News: आधी पतीला दोरीनं बाधलं, नंतर मुलाच्या गळ्यावर चाकू ठेवला; महिलेवर केला लैंगिक अत्याचार

याप्रकरणी प्रयागराज महाकुंभ मेळ्याचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, 'सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ तसेच टेलिग्राम ग्रुपचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात येत आहे. तसेच कारवाई केली जाईल'.

तर माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, महाकुंभात महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com