Rajya sabha Election: राज्यसभेच्या आठ जागांसाठी १९ जूनला मतदान; कशी बसणार ताळमेळ, जाणून घ्या कोणाकडे किती जागा?

Rajya sabha Election: राज्यसभेच्या ८ जागांसाठी निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करण्यात आलीय. राज्यसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जारी केली जाणार आहे.
Rajya sabha Election
Rajya sabha Election
Published On

राज्यसभेच्या ८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तामिळनाडू ६ आणि आसामध्ये २ जागा जून, जुलैमध्ये रिक्त होत आहे. ज्यासाठी १९ जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी केली जाईल. राज्यसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जारी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना २ जून रोजी जारी केली जाईल आणि ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

राज्यसभेच्या मतदानासाठी आमदार मतदान करत असतात, त्यामुळे हे लोकसभा, विधानसभा, पंचायत या निवडणुकांपेक्षा खूप वेगळे असतात. त्यातील मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीचे गणित खूप वेगळं असतं. प्रत्येक राज्यातील रिक्त राज्यसभेच्या जागांची संख्या आणि आमदारांची संख्येवरून निश्चित केली जाते. त्यावरून एका उमेदवाराला विजयासाठी किती मतांची गरज हे त्यावरून ठरते.

Rajya sabha Election
छोड आये हम वो गलियाँ... राजकारणापासून विश्रांती, धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात दाखल, १० दिवस विपश्यना !

आधी आपण तामिळनाडूमधील जागांची माहिती घेऊ. तामिळनाडूत एका उमेदवाराला जिंकण्यासाठी ३४ मतांची गरज आहे. तामिळनाडूच्या विधानसभेत एकूण २३५ जागा असून २३४ आमदार आहेत. या राज्यात सत्ताधारी द्रविड मुनेत्र काषगम पक्षाचे १३३ आमदार आहेत. त्यानंतर काँग्रेसकडे १७, वीसीकेकडे ४ आणि डाव्या पक्षांकडे ४ आमदार आहेत. विरोधी पक्ष एआयडीएमके या पक्षाकडे ६६ आमदार तर भाजपचे ४ आमदार आहेत.

Rajya sabha Election
Manipur Government: मणिपूरमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार; सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग,भाजपला किती आमदारांचा पाठिंबा?

तामिळनाडूतील ६ राज्यसभेच्या जागांपैकी तीन जागा द्रमुकच्या आहेत. तर राज्यसभेच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी ३४ मते आवश्यक आहेत, म्हणजेच ३४ आमदारांची मते मिळणं आवश्यक आहे. द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांचे संख्याबळ १५८ आहे. त्यामुळे ४ जागांवर त्यांचा विजय निश्चित आहे. एका जागेवर अण्णाद्रमुकचा विजय निश्चित मानला जातोय.

जर एआयएडीएमकेला दुसरी जागा जिंकायची असेल तर त्यांना भाजपचे चार आमदार देखील आवश्यक असतील. अशा स्थितीत तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना भाजप राज्यसभेवर पाठवू शकते अशा बातम्यांमध्ये आहेत. अण्णाद्रमुकशी असलेल्या कटु संबंधांमुळे त्यांच्यासाठी राज्यसभेत पोहोचण्याचा मार्ग सोपा नसणार आहे.

आसाममधील राज्यसभेच्या दोन्ही जागा भाजप जिंकणार?

येथील विधानसभेची संख्या १२६ आहे, त्यापैकी सत्ताधारी भाजपकडे ६४ आमदार आहेत. त्यांच्या मित्रपक्ष आसाम गण परिषदेकडे नऊ आमदार आहेत. यूपीपीएलकडे ७ आमदार आहेत. सत्ताधारी भाजप युतीचे संख्याबळ ८० वर पोहोचले आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ४३ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

एका जागेवर भाजपचा विजय निश्चित आहे. परंतु दुसरी जागा जिंकण्यासाठी त्यांना आणखी २२ मतांची आवश्यकता आहे. याचा अर्थ असा की जरी भाजपला त्यांच्या मित्रपक्षांकडून १६ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी हा आकडा फक्त ३७ राहील, म्हणजेच ६ आमदार अजूनही कमी आहेत. दुसरीकडे, विरोधी काँग्रेसकडे २६ आमदार आहेत.

सीपीआयचा एक, एआययूडीएफचा १५ आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचा तीन आमदार आहेत. जर या पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली तर त्यांची संख्या ४५ पर्यंत वाढेल आणि त्यांना राज्यसभेची दुसरी जागा मिळू शकेल.

राज्यसभा निवडणुकीत मतदानाचा फॉर्म्युला काय?

राज्यसभा निवडणुकीत आमदार मतदान करतात. राज्यातील विधानसभेच्या जागांची संख्या राज्यसभेच्या एकूण जागांच्या संख्येने भागली जाते. राज्यातील रिक्त जागांच्या संख्येत एक जागा जोडली जाते. आणि त्यातून येणारा आकडा म्हणजे राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com