डाव्यांच्या केरळमध्ये राजकीय भूकंप; तब्बल चार दशकानंतर तिरुवनंतपुरममध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

kerala local body election : डाव्यांच्या केरळमध्ये राजकीय भूकंप झालाय. तब्बल चार दशकानंतर तिरुवनंतपुरममध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवलाय.
kerala news
kerala local body election Saam tv
Published On
Summary

केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये भाजपने मिळवला ऐतिहासिक विजय

तब्बल चार दशकांनंतर डाव्या विचारांच्या पक्षाचा बालेकिल्ला ढासळला

तिरुवनंतपुरमममधील शहरी मतदारांची LDF विरोधातील नाराजी उघड

केरळच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. केरळच्या तिरुवनंतपुरममधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तिरुवनंतपुरम महापालिकेची सत्ता भाजपने डावी लोकशाही आघाडीकडून हिसकावून घेतली आहे. भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर केरळमध्ये राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तिरुवनंतपुरम केवळ केरळची राजधानी नाही. तर राजकीय दृष्टीकोनातूनही महत्वाचं क्षेत्र मानलं जातं. या भागातील लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत काँग्रेस आणि डाव्यांचा प्रभाव होता. मात्र, आता या भागात भाजपचा विजय नव्या राजकीय समीकरणाची नांदी मानली जात आहे.

kerala news
बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील विजय हा ४-५ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्याचा सारखा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपची एन्ट्री झाल्याने मतदारांना नवा पर्याय हवा असल्याचे संकेत मिळत आहेत. या भागात राजकीय लढाई विशेष म्हणजे हा LDF आणि UDF मध्ये व्हायची.

मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे की, शहरी मतदारांची LDF च्या विरोधात नाराजी आहे. शहरातील विकास कामे, पारदर्शक कारभार आणि स्थानिक मुद्द्यांवरून मतदारांनी थेट भाजपला साथ दिल्याचे समोर आलं आहे. तिरुवनंतपुरममध्ये भाजप निवडून आल्याने डाव्यांचा बालेकिल्ला ढासळू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

kerala news
भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

तिरुवनंतपुरम महापालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी तिरुवनंतपुरमच्या नागरिकांचेही आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com