
लखनऊ: डीजीपी मुख्यालयात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या प्रतापगडचे तहसीलदार, त्यांची पत्नी आणि मित्र यांना अटक करून लखनऊ पोलिसांनी या हत्येचा उलघडा केला. महिला कॉन्स्टेबलची हत्या ही गुंतागुंतीचे संबंध आणि कटातून घडली आहे.
फेसबुकच्या माध्यमातून तहसीलदारांशी ओळख;
तपासादरम्यान पोलिसांना सापडलेले पुरावे आणि आसंद्रा पोलीस ठाण्यात तैनातीदरम्यान समोर आलेली माहिती हे दर्शवत होती की, पोलिसांच्या नोकरीत रुचीने आपल्या सहकारी हवालदाराशी लग्न केले होते, परंतु बाराबंकी येथे पोस्टिंग करताना फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख तहसीलदार पद्मेश यांच्याशी झाली.
जमिनीच्या वादामुळे जवळीकता;
त्यानंतर जवळच्या व्यक्तीशी प्रतापगडमधील जमिनीच्या वादात पद्मेश श्रीवास्तव यांची मदत घेतल्यानंतर दोघांच्या भेटी वाढल्या. त्यानंतर रुचीने आपल्या हवालदार पतीला सोडून तहसीलदारला पती बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यानंतर पतीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तिने घटस्फोटाचा अर्जही दाखल केला.
तहसीलदार रुचीला भेटायला लखनौला येत असत;
कोर्टात सुरू असलेल्या घटस्फोटाच्या खटल्याचा निर्णयही याच महिन्यात येणार होता. यामुळेच रुचीने विवाहित तहसीलदाराला पती बनवण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. पद्मेश हे सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीशी मैत्री इतकी घट्ट झाली होती की, पत्नी प्रगतीला अलाहाबादमध्ये सोडून ते रुचीला भेटण्यासाठी लखनऊला येऊ लागले.
हे देखील पहा-
नामवर सिंगही कटाचा बळी;
लखनौला बदली झाल्यानंतर रुची सुलभ अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होत्या. ही अपार्टमेंटसुद्धा तहसीलदारांनी दिल्याचे सांगितले जाते. आता या अपार्टमेंटच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू आहे. या हत्येतील पती-पत्नीशिवाय तिसरा आरोपी नामवर सिंग हाही कटात सहभागी होता.
नामवर सिंगला फसवण्याचा कट;
रुची सिंगच्या वारंवार लग्नाच्या दबावाला कंटाळून पद्मेश आणि त्याची पत्नी प्रगती यांनी तिला मार्गातून बाहेर काढण्यासाठी प्लॅन केला. या केलेल्या प्लॅनमध्ये नामवर सिंग एका प्याद्यासारखा होता. प्रत्यक्षात प्लॅनिंग असे होते की, पद्मेश रुचीला मीटिंगसाठी पद्मेश बोलावेल, पण नशेच्या अवस्थेत तिला मारून पमृतदेह फेकून देण्याचे काम नामवर करणार होता.
नामवर ने डाळिंबाच्या रसात गोळ्या मिसळल्या;
तहसीलदारच्या प्लॅननुसार, खुनाच्या गुन्ह्यात कोणी पकडले तरी तो नामवरच होता. १२ फेब्रुवारीला संध्याकाळी पद्मेशने रुचीला फोन करून भेटण्यासाठी पीजीआय परिसरात बोलावले. रुची आणि पद्मेश ज्या गाडीत बसले होते ती गाडी नामवरची होती. नामवार यांनी पीजीआयमधील एका ज्यूस कॉर्नरमधून डाळिंबाच्या रसामध्ये 10 गोळ्या मिसळून रुचीला दिल्या.
नामवरची एक चूक अन् तहसीलदारची पत्नीही फसली;
रुची बेशुद्ध पडल्यावर हत्येनंतर नामवारने रुचीचा मृतदेह गाडीतून नाल्यात फेकून दिला, मात्र नामवारच्या चुकीमुळे तहसीलदारांच्या पत्नी प्रगती श्रीवास्तव सापडल्या गेल्या. नामवारने घटनास्थळावरून रुचीचा फोन बंद केल्यावर त्याने प्रगती यांना तेथून फोन करून काम पूर्ण झाल्याचे सांगितले.
पोलिस तपासात रुचीचे तहसीलदारांशी झालेले शेवटचे बोलणे आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून तहसीलदारांच्या पत्नीच्या नंबरवर आलेला कॉल आणि रुचीचा मोबाईल बंद होण्याची वेळ या तीनही घटनांची या संपूर्ण कटाची जोड झाली आणि तिन्ही आरोपी पकडले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.