Maharashtra Corona Updates: महाराष्ट्रात कोरोनापासून मोठा दिलासा, 24 तासांत एक हजारांहून कमी नवे रुग्ण

महाराष्ट्रात तसेच देशातही कोरोनाचा वेग मंदावला आहे. मात्र, याचा अर्थ धोका पूर्णपणे संपला आहे असा होत नाही.
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSaam Tv
Published On

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा (Maharashtra Corona Updates) वेग मंदावला आहे. मात्र, धोका पूर्णपणे संपला आहे असेही नाही. सोमवारी राज्यात कोरोनाचे 806 नवीन रुग्ण आढळून आले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने (Health Department) ही माहिती दिली. त्याचप्रमाणे मुंबईतही (Mumbai) कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत.

त्याच वेळी राज्यात ओमिक्रॉनची (Omicron) 53 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आता एकूण संक्रमितांची संख्या 78,59,237 झाली आहे तर मृतांची संख्या 1,43,582 वर पोहोचली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोविड-19 चे कमी रुग्ण आढळले आहेत. रविवारी याचे 1437 नवीन रुग्ण आढळले. बुलेटिननुसार, गेल्या 24 तासांत 2,696 लोक संसर्गातून बरे झाल्यानंतर, बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या 76,97,135 झाली आहे. राज्यात सध्या 14,525 रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 170 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. (Maharashtra Corona Latest Updates)

देशातही कोरोनाचा वेग मंदावला, 24 तासांत 13,405 नवीन रुग्णांची नोंद;

गेल्या एका दिवसात भारतात (India) कोरोनाची 13,405 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यामुळे एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,28,51,929 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Of Health) मंगळवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 49 दिवसांनंतर, देशात कोविड (COVID-19) वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. सकाळी 8 वाजेच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात महामारीमुळे 235 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 5,12,344 वर पोहोचली आहे. (Corona Updates India in Marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com