
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. आजच्या या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने (Central Government) काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या (Nirmala Sitharaman) या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासीयांना संबोधित करत बजेटचं कौतुक केलं आहे.
अर्थसंकल्पाने विकासाचा नवा आत्मविश्वास दिला
अर्थसंकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 100 वर्षांच्या भयंकर आपत्तीच्या काळात या अर्थसंकल्पाने विकासाचा नवा आत्मविश्वास दिला आहे. या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासोबतच सर्वसामान्यांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होणार आहेत.
हे देखील पहा -
नवीन शक्यतांनी भरलेला अर्थसंकल्प
हा अर्थसंकल्प अधिक पायाभूत सुविधा, अधिक गुंतवणूक, अधिक विकास आणि अधिक नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी परिपूर्ण आहे. यामुळे अनेक नोकऱ्यांचे क्षेत्रही खुले होईल. ते म्हणाले की, या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा घटक म्हणजे गरिबांचे कल्याण. प्रत्येक गरीबाला पक्के घर मिळावे, नळाला पाणी, शौचालय, गॅसची सुविधा या सर्व गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासोबतच आधुनिक इंटरनेट सुविधांवर देखील तितकाच भर आहे.
देशात पर्वतमाला योजना सुरू करणार
देशात प्रथमच हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, ईशान्येकडील भागांसाठी पर्वतमाला योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेमुळे डोंगरावर वाहतुकीची आधुनिक व्यवस्था निर्माण होणार आहे. ते म्हणाले की, गंगा स्वच्छतेसह शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या पाच राज्यांमध्ये, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, गंगेच्या काठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले जाईल.
प्रगतीशील अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्र्यांचे अभिनंदन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या लोकस्नेही आणि प्रगतीशील अर्थसंकल्पासाठी मी अर्थमंत्री निर्मला जी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.