तळघरात 650 लॉकर्स, कोट्यवधी रुपये जप्त!नोएडामधील माजी IPSच्या घरावर ITचा छापा

नोएडा येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग यांच्या घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत. त्यांचा मुलगा खाजगी लॉकर फर्म चालवतो.
IT Raid On RN Singh's House
IT Raid On RN Singh's HouseSaam Tv
Published On

नोएडा: आज सर्वसामान्यांचे बजेट जरी बिघडले असेल, पण काही लोक असे असतात ज्यांचे बजेट एव्हरग्रीन असते. परंतु सध्या, असे लोक आयकर विभागाच्या (Income Tax Department) निशाण्यावर आहेत. नोएडा (Nioda) येथील यूपी कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी आरएन सिंग (IT Raid On RN Singh's House) यांच्या घरावर गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाचे छापे सुरू आहेत.

वृत्तसंस्थेच्या वृत्तसंस्थेनुसार, आरएन सिंग यांचा मुलगा त्यांच्या घराच्या तळघरात खाजगी लॉकर फर्म चालवतो. हे लॉकर्स भाड्याने दिले आहेत. प्राप्तिकर विभागाने येथील शोध मोहिमेत कोट्यवधी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हे पैसे कोणाचे? आहेत हे स्पष्ट झाले नाहीत शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या तिजोरीत 650 लॉकर असल्याचे सांगितले जात आहे.

IT Raid On RN Singh's House
पुणे मुंबई महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; दृश्य CCTVमध्ये कैद!

आरएन सिंग हे यूपीचे डीजी प्रॉसिक्यूशन (DG Prosecution) होते. त्यांनी संगीतल की, ही फर्म त्यांचा मुलगा चालवतो, तो कमिशनच्या आधारावर लॉकर्स भाड्याने देतो, त्याच्याकडे 2 लॉकर देखील आहेत पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

हे देखील पहा-

परंतु यावर, माजी आयपीएस आरएन सिंग म्हणाले, जसे बँका देतात तसे 'माझा मुलगा लॉकर भाड्याने देतो. तो बँकांपेक्षा जास्त सुविधा देतो, यामध्ये आमच्याकडे दोन लॉकर्स खासगी आहेत, सध्या आतमध्ये चौकशी सुरू आहे, जवळपास सर्व लॉकर्स तपासले आहेत, आमच्याकडे सर्व तपशील आहेत. काय सापडले आहे, घरातील काही दागिने टीमला सापडले आहेत, आमच्याकडे संपूर्ण कागदपत्रे आहेत, असेही त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com